दिल्लीने राजस्थानला हरवले: ऑस्ट्रेलियन स्टार्सने डीसीला मिळवूण दिला शानदार विजय, १२ गुणांसह, संघ प्ले-ऑफच्या शर्यतीत

या विजयासह दिल्लीचे १२ सामन्यांतून १२ गुण झाले असून ते प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या शर्यतीत आहेत. राजस्थानचे १२ सामन्यांत १४ गुण आहेत. वॉर्नर आणि मार्श यांनी दुसऱ्या विकेटसाठी १४४ धावांची भागीदारी केली. मार्श तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून मैदानात उतरला होता.

    मुंबई – आयपीएल २०२२ मध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा एकतर्फी ८ गडी राखून पराभव केला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने २० षटकांत ६ गडी गमावून १६० धावा केल्या. रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक ५० धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीने १८.१ षटकांत २ गडी गमावून लक्ष्य गाठले. मिल्च मार्शने ६२ चेंडूत ८९ धावांची शानदार खेळी खेळली. डेव्हिड वॉर्नरने नाबाद ५२ धावा केल्या.

    या विजयासह दिल्लीचे १२ सामन्यांतून १२ गुण झाले असून ते प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या शर्यतीत आहेत. राजस्थानचे १२ सामन्यांत १४ गुण आहेत. वॉर्नर आणि मार्श यांनी दुसऱ्या विकेटसाठी १४४ धावांची भागीदारी केली. मार्श तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून मैदानात उतरला होता. सलामीवीर श्रीकर भरत पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर खाते न उघडता बाद झाला. त्याची विकेट ट्रेंट बोल्टने घेतली.