दिल्लीचा राजस्थानवर 33 धावांनी दणदणीत विजय

कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) एकट्यानं 70 धावांची खेळी केली, मात्र दुसऱ्या बाजूने साथ मिळाली नाही. त्याच्या व्यतिरिक्त महिपाल लोमरोर याच्या 19 धावा वगळता राजस्थानच्या फलंदाजी केलेल्या एकाही खेळाडूला दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही.

    अबुधाबी: दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल (DC Vs RR) यांच्यात आज सामना खेळवण्यात आला. यामध्ये दिल्ली कॅपिटल (Delhi Capitals) संघाने दिलेल्या 155 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा (Rajasthan Royals) संघ 121 धावांवर ढेपाळला.