दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये होणार मुकाबला, कोणता संघ पडेल भारी?

सामन्याच्या पहिल्या सत्रात भारताचा वेगवान खेळाडू श्रेयस अय्यर इंग्लंडच्या विरूद्ध खेळताना त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. फिट झाल्यानंतर त्याने टीममध्ये वापसी साधली. त्याची फलंदाजी दिल्लीच्या संघाला पुढे घेऊन जाऊ शकते. पृथ्वी शॉ आणि शिखर धवनच्या रूपात दिल्लीकडे ओपनिंगची सलामीवीर जोडी आहे.

    आयपीएल २०२१ च्या (IPL-2021) दुसऱ्या सत्राला सुरूवात झाली आहे. आज बुधवार दिल्ली कॅपिटल्स आणि सैनरायजर्स हैदराबाद यांच्यात कांटे की टक्कर होणार आहे. दोन्ही संघ अनेक महिन्यानंतर एकत्र येणार आहेत. पहिल्या सत्रामध्ये  दिल्लीची टीम ८ सामन्यांमधून १२ व्या अंकांनुसार टेबल पॉईंटमध्ये नंबर एकच्या स्थानावर होती. तर हैदराबादची टीम ७ सामन्यांमधून २ अंकांनुसार शेवटच्या स्थानावर होती.

    सामन्याच्या पहिल्या सत्रात भारताचा वेगवान खेळाडू श्रेयस अय्यर इंग्लंडच्या विरूद्ध खेळताना त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. फिट झाल्यानंतर त्याने टीममध्ये वापसी साधली. त्याची फलंदाजी दिल्लीच्या संघाला पुढे घेऊन जाऊ शकते. पृथ्वी शॉ आणि शिखर धवनच्या रूपात दिल्लीकडे ओपनिंगची सलामीवीर जोडी आहे. तर कर्णधार ऋषभ पंत, मार्कस स्टोइनिस आणि शिमरोन हेटमायर ही खेळाडू फलंदाजीसाठी उत्कृष्ट समजले जात आहेत.

    टी-नटराजनने UAE मध्ये झालेल्या आय़पीएल २०२० च्या सामन्यात १६ विकेट्स घेतले होते. परंतु दुखापत झाल्यामुळे पहिल्या सत्राला तो खेळू शकला नाही. परंतु आता नटराजन फिट असून हैदराबाद मध्ये त्याने चांगल्या उत्साहात आणि धारदार गोलंदाजी करण्यासाठी कमबॅक करणार आहे.