केवळ २ परदेशी खेळाडूंसह मैदानात उतरला दिल्ली कॅपिटल्स

दिल्ली संघाने त्यांच्या अंतिम ११ जणांच्या संघामध्ये केवळ २ परदेशी खेळाडूंना स्थान दिले आहे. यात टीम सिफर्ट आणि रोवमन पॉवेल यांचा समावेश आहे. यासह प्लेइंग इलेव्हनमध्ये केवळ २ परदेशी उतरवणारा दिल्ली केवळ दुसराच संघ ठरला आहे.

    मुंबई – क्रिकेटविश्वातील सर्वात मोठी टी२० लीग, इंडियन प्रीमियर लीगचे बिगूल वाजले आहे. शनिवारपासून (२६ मार्च) आयपीएल २०२२ चा हंगाम सुरू झाला आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएलचा उद्घाटन सामना झाल्यानंतर रविवारी (२७ मार्च) पहिला डबल हेडर खेळवला गेला. यातील पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ आमने सामने होते. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली संघाच्या खात्यात अनोख्या विक्रमाची नोंद झाली आहे.

    उभय संघातील (MI vs DC) सामन्यासाठी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.०० वाजता नाणेफेक झाली. दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यात मुंबईकडून तिलक वर्मा, टीम डेव्हिड, मुरुगन अश्विन, रिली मेरेडीथ आणि टायमल मिल्स यांनी पदार्पण केले आहे. तसेच मुंबईने अंतिम ११ जणांच्या संघात ४ परदेशी खेळाडूंना स्थान दिले आहे. यात टीम डेव्हिड, रिली मेरेडीथ आणि टायमल मिल्स यांच्यासह कायरन पोलार्डचा समावेश आहे.

    मात्र दिल्ली संघाने त्यांच्या अंतिम ११ जणांच्या संघामध्ये केवळ २ परदेशी खेळाडूंना स्थान दिले आहे. यात टीम सिफर्ट आणि रोवमन पॉवेल यांचा समावेश आहे. यासह प्लेइंग इलेव्हनमध्ये केवळ २ परदेशी उतरवणारा दिल्ली केवळ दुसराच संघ ठरला आहे.