पराभवानंतरही मुंबई इंडियन्सला अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी? जाणून घ्या संपूर्ण समीकरण

आयपीएल 2024 मधील मुंबई इंडियन्सचा हा आठवा पराभव होता. या पराभवामुळे हार्दिकची सेना आयपीएल 2024 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडली आहे.

    मुंबई इंडियन्स : काल मुंबई इंडियन्सचा सामना कोलकाता नाईट राइडर्सच्या संघासोबत झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 12 वर्षांनंतर कोलकाता नाईट रायडर्सकडून मुंबई इंडियन्सचा पराभव झाला. सुरुवातीच्या खेळामध्ये कोलकाता नाईट राइडर्सचा संघ डगमगला होता. परंतु त्यानंतर जबरदस्त कामगिरी दाखवत मुंबईचा त्याच्याच घरी 24 धावांनी पराभव केला. आयपीएल 2024 मधील मुंबई इंडियन्सचा हा आठवा पराभव होता. या पराभवामुळे हार्दिकची सेना आयपीएल 2024 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडली आहे.

    आतापर्यत मुंबई इंडिअन्सचे 11 सामने झाले आहेत यामध्ये त्यांनी फक्त 3 सामन्यांमध्ये विजय मिळवून 6 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. चला जाणून घेऊया मुंबई इंडियन्सच्या IPL 2024 च्या प्लेऑफचे संपूर्ण समीकरण. मुंबई इंडियन्सच्या 11 सामन्यांत केवळ सहा गुण आहेत. केकेआरकडून संघाला 24 धावांनी पराभव स्वीकारावा लागला आणि यानंतर संघाला आता तीन सामने खेळायचे आहेत. मुंबईला प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल तर संघाला उर्वरित तीनही सामने जिंकावे लागतील.

    तिन्ही सामने जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या खात्यात 12 गुण होतील, पण आयपीएलच्या इतिहासात असे दिसून आले आहे की संघांना 14 गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचणे कठीण होते. मात्र, मुंबईला आतापर्यंत केवळ 6 गुणांपर्यंतच मजल मारता आली आहे. मुंबईच्या संघाने चमत्कारिक कामगिरी करून आपले पुढील तीन सामने जिंकले तर प्लेऑफसाठी पात्र ठरण्यासाठी इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. म्हणजे कुठे ना कुठे मुंबई संघाला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची काहीशी शक्यता आहे.