Mumbai Indiansला हरवण्यासाठी CSKची टीम तयार, सामन्याआधी दिसलं धोनीचं रौद्र रूप ; Video तुफान व्हायरल

पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स (MI Vs CSK)  यांच्यात रंगणार आहे. तसेच हा सामना यूएईमध्ये खेळला जाणार आहे. अशातच एक भारताचा माजी कॅप्टनकूल महेंद्र सिंग (MS DHONI) धोनीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड (Video Viral On Social Media) व्हायरल होत आहेत.

    नवी दिल्ली: आयपीएल २०२१ (IPL 2021)  चं दुसरं सत्र उद्या (रविवार) १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स (MI Vs CSK)  यांच्यात रंगणार आहे. तसेच हा सामना यूएईमध्ये खेळला जाणार आहे. अशातच एक भारताचा माजी कॅप्टनकूल महेंद्र सिंग (MS DHONI) धोनीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड (Video Viral On Social Media) व्हायरल होत आहेत. यामध्ये माही जोरदार फटकेबाजी करताना दिसत आहे. (Dhoni is in good form ahead of the match)

    तुफान फटकेबाजी

    सीएसके संघाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये धोनी फलंदाजी करताना दिसत आहे. मुखत्वे तोे हॅलिकॉप्टर शॉर्ट मारताना दिसत आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरच्या बॉलवर त्याने उंच असा एका षटकार लगावला आहे. त्यामुळे मुंबईला टक्कर देण्यासाठी धोनी अधिक मेहनत घेताना दिसत आहे.

    मागील हंगामात धोनीचा फॉर्म ठरला खराब

    २०२१ च्या हंगामात धोनीने एवढी खास कामगिरी केली नव्हती. आयपीएल २०२० मध्ये धोनीने १४ सामन्यांमध्ये २०० धावा केल्या होत्या. त्यामुळे सीएसके प्लेऑफ पर्यंत सुद्धा पोहोचली नव्हती. तर आयपीएल २०२१ मध्ये धोनीने आतापर्यंत एकूण ३७ धावा केल्या आहेत. परंतु हा व्हिडिओ पाहून धोनी पुन्हा एकदा नवीन जोश आणि अंदाजात दिसणार असल्याचं समजलं जात आहे.