…म्हणून जडेजाने कर्णधारपद सोडले; धोनीने दिले रोखठोक उत्तर

जेव्हा तुम्ही कर्णधार होता, तेव्हा तुमच्याकडून अपेक्षाही उंचावतात. पण, कर्णधारपदाचे ओझे जडेजाला पेलवत नव्हते. शेवटी ही मानसिक कणखरता पाहणारी जबाबदारी आहे. कर्णधारपदाचा जडेजाच्या मानसिक कणखरतेवर परिणाम होताना मला दिसला आणि त्या ओझ्याखाली त्याची कामगिरी खालावत गेली. मला जडेजा उत्तम गोलंदाज, फलंदाज आणि अफलातून क्षेत्ररक्षक म्हणून हवा. त्यामुळे त्याच्यावर अधिक ओझे थोपवायचे नव्हते, हे धोनीने स्पष्ट केले(Dhoni's reaction to Jadeja's resignation).

    मुंबई : जेव्हा तुम्ही कर्णधार होता, तेव्हा तुमच्याकडून अपेक्षाही उंचावतात. पण, कर्णधारपदाचे ओझे जडेजाला पेलवत नव्हते. शेवटी ही मानसिक कणखरता पाहणारी जबाबदारी आहे. कर्णधारपदाचा जडेजाच्या मानसिक कणखरतेवर परिणाम होताना मला दिसला आणि त्या ओझ्याखाली त्याची कामगिरी खालावत गेली. मला जडेजा उत्तम गोलंदाज, फलंदाज आणि अफलातून क्षेत्ररक्षक म्हणून हवा. त्यामुळे त्याच्यावर अधिक ओझे थोपवायचे नव्हते, हे धोनीने स्पष्ट केले(Dhoni’s reaction to Jadeja’s resignation).

    आयपीएलच्या मागील पर्वातच रवींद्र जडेजाला हे माहीत होते की त्याला पुढे सीएसकेचे नेतृत्व सांभाळायचे आहे. यंदाच्या पर्वात पहिल्या दोन सामन्यांत मी त्याच्यावर एकदम जबाबदारी टाकली नाही. मी त्याच्या निर्णयावर लक्ष ठेऊन होतो. पण, 2-3 सामन्यानंतर त्याला मी निर्णय व जबाबदारी घेण्यास सांगितली.

    तुमचे डोके जेव्हा खूपच काम करायला लागते तेव्हा कर्णधाराला झोपेतही विश्रांती मिळत नाही. या पर्वाच्या अखेरीस जडेजाला हे वाटायला नको की तो फक्त टॉससाठी यायचा आणि खरे नेतृत्व दुसरेच करीत होता, असेही धोनी म्हणाला.