पत्नीने भारतासाठी मेडल जिंकताच दिनेश कार्तिकने दिली “ही” प्रतिक्रिया

    बर्लिंगहम येथे येथील सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022) सौरव घोषाल आणि दीपिका पल्लीकल या दिग्गज भारतीय स्क्वॉश जोडीने पुन्हा एकदा आपले कौशल्य दाखवले आहे. घोषाल आणि पल्लीकल यांनी राष्ट्रकुल क्रीडा २०२२ मध्ये स्क्वॉशच्या मिश्र दुहेरीत भारतासाठी कांस्यपदक (Bronze) जिंकले. दीपिका ही भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू दिनेश कार्तिकची (Dinesh Kartik) पत्नी असून बातमी दीपिकाची कामगिरी पाहून त्याने भावुक होत ही प्रतिक्रिया दिली आहे.

    दिनेश कार्तिकने सोशल मीडियावरपोस्ट शेअर करत म्हंटले की,’तुमची मेहनत फळाला आली आहे. तुमच्या दोघांच्या यशावर मी खूप खुश आहे. मला तुमचा अभिमान आहे.’

    पल्लीकल आणि सौरव यांनी पहिला गेम ११-८ आणि दुसरा गेम ११-४ असा जिंकला. २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत दीपिका आणि सौरवने रौप्य पदक जिंकले होते. मात्र, यावेळी ही जोडी चमत्कार करू शकली नाही आणि उपांत्य फेरीत पराभूत झाली. मात्र, भारतीय जोडीने कांस्यपदकाची लढत जिंकली आहे. बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला ५० वे पदक पटकावून दिले.

    दिनेश कार्तिक आणि भारताची स्टार स्कवॉश खेळाडू दीपिका पल्लीकल यांच्याकडे आदर्श जोडपं म्हणून पाहिल जाते. दिनेशने क्रिकेटच्या मैदानात यश मिळवलं, तर दीपिकाने स्क्वॉश कोर्टवर. यापूर्वी दीपिकाने कॉमनवेल्थ गेम्स मध्ये एक गोल्ड आणि दोन रौप्य पदकं मिळवली आहेत.

    दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकल यांनी नोव्हेंबर २०१३ मध्ये साखरपुडा झाला आणि दोन वर्षांनंतर ऑगस्ट २०१५ मध्ये लग्न केले. त्यांना आता दोन जुळी मुलं आहेत.