टीम इंडियाला दुहेरी झटका, हे 2 स्टार खेळाडू दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर

जडेजाला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे बाहेर राहावे लागले आहे, तर राहुल देखील पूर्णपणे तंदुरुस्त नाही.

    श्रेयस अय्यरचा कसोटी क्रिकेटमधील फ्लॉप शो थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. हैदराबादमध्ये झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातही श्रेयसची बॅट शांत राहिली. अय्यरने दोन्ही डावात चांगली सुरुवात केली, पण त्याची विकेट फेकल्यानंतर तो निघून गेला. क्रिकेटच्या प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये अय्यरने आपल्या बॅटने अर्धशतक झळकावून बराच काळ लोटला आहे.

    याचदरम्यान आता दुसरा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला दुहेरी धक्का बसला आहे. संघाचे स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि केएल राहुल विशाखापट्टणम येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडले आहेत. जडेजाला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे बाहेर राहावे लागले आहे, तर राहुल देखील पूर्णपणे तंदुरुस्त नाही. या दोघांच्या जागी सरफराज खान, सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

    जडेजा-राहुल बाद बीसीसीआयची X खात्यावर पोस्ट
    आपल्या X खात्यावर पोस्ट शेअर करताना, बीसीसीआयने म्हटले आहे की केएल राहुल आणि रवींद्र जडेजा दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात संघाचा भाग नसतील. पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी जडेजाला दुखापत झाली होती, ज्यातून तो सावरू शकला नाही.