लखनऊ आणि बंगळुरू सामन्यानंतर मैदानावरच कोहली-गंभीरची हमरीतुमरी, पुढे असं झालं की…

सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार वाद झाला. दोघेही मैदानातच एकमेकांवर भिडले. वाद वाढत असल्याचे पाहून एलएसजीचा कर्णधार केएल राहुल आणि वरिष्ठ खेळाडू अमित मिश्रा यांनी मध्यस्थी करून प्रकरण हाताळले.

    लखनऊ – इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) अर्धा हंगाम संपत आला आहे, तरी देखील बंगळुरु संघाला अजून सुर गवसला नाहीय, दरम्यान, काल झालेल्या  लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात सामना पार पडला. हा सामना बंगळुरूने त्यांच्या घरच्या मैदानावर लखनऊचा 18 धावांनी पराभव करून मागील पराभवाचा बदला घेतला. मात्र सामन्यानंतर वातावरण तापले होते. कारण दोन दिग्गज खेळाडू ऐकमेकांशी मैदानावरच भिडले होते. या व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

    वाद नेमका कशामुळं

    दरम्यान, लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर सोमवारी रात्री झालेल्या सामन्यानंतर दोन वरिष्ठ खेळाडूंमध्ये वाद सुरू झाला. हा वाद नेमका मॅच संपल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांना हस्तांदोलन करत होते. त्याचवेळी सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार वाद झाला. दोघेही मैदानातच एकमेकांवर भिडले. वाद वाढत असल्याचे पाहून एलएसजीचा कर्णधार केएल राहुल आणि वरिष्ठ खेळाडू अमित मिश्रा यांनी मध्यस्थी करून प्रकरण हाताळले. दरम्यान, कोहली-गंभीर यांच्यातील संघर्षाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही होऊ लागले आहेत. वादाचे कारण मात्र समजू शकले नाही.

    दंड ठोठावण्यात आला…

    कोहली-गंभीर यांच्या वादानंतर, कोहली आणि नवीनने आपली चूक मान्य केलेली आहे. तर LSG मार्गदर्शक गौतम गंभीर आणि माजी RCB कर्णधार विराट कोहली यांना IPL आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्यांच्या मॅच फीच्या 100% दंड ठोठावण्यात आला. एलएसजीचा गोलंदाज नवीन-उल-हकलाही त्याच्या मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.