सेमीफायनल सामन्यात इंग्लंडचा भारतावर १० विकेट्सने विजय

कर्णधार जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी पहिल्या ओव्हरपासून चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत धावसंख्या वाढवत ठेवली. बटलरने ४९ चेंडूत नाबाद ८० धावा तर हेल्सने ४७ चेंडूत नाबाद ८६ धावा केल्या. ज्यामुळे अवघ्या १७ षटकातंच त्यांनी हे आव्हान पार करत सामना खिशात घातला. यासामन्यात भारताच्या एकाही गोलंदाजांला चांगली गोलंदाजी करून विकेट मिळवता आली नाही.

    टी २० विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाचे आव्हान आता संपुष्ठात आले आहे. गुरुवारी पारपडलेल्या सेमी फायनल सामन्यात इंग्लंडने दमदार फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाचा १० विकेट्सने पराभव केला. या विजयानंतर १३ नोव्हेंबर रोजी मेलबर्न येथे इंग्लंडचा संघ पाकिस्तान संघासोबत विश्वचषकाचा अंतिम सामना खेळणार आहेत.

    भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) या सेमीफायनलच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी केली. कोहली आणि पांड्याच्या जोडीच्या मदतीनं भारतीय संघाने इंग्लंडला १६९ धावांचे आव्हान दिले. परंतु इंग्लंडने फलंदाजीला येत सुरुवातीपासून तुफान फटकेबाजी करत १६ षटकांत १७० धावा करत तब्बल १० विकेट्स राखून विजय मिळवला.

    प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघातील सलामीवीर केएल राहुल अगदी स्वस्तात ५ धावा करुन तंबूत परतला. तर रोहितने मात्र २७ धावांची खेळी केली, पण तो देखील मोठी खेळी करु शकला नाही आणि भारताला दुसरा झटका बसला. ज्यानंतर कोहली आणि सूर्या आजही दम दाखवतील असं वाटत असताना सूर्यकुमार १४ धावांवर बाद झाला. पण कोहली मात्र एकहाती झुंज देतच होता. पांड्याने त्याला संथगतीने साथ दिली. मग कोहली ५० धावा करुन बाद होताच पांड्याने फटेकबाजीला सुरु केली. त्याने ३३ चेंडूत ६३ धावा ठोकल्या पण शेवटच्या चेंडूवर तो चूकीने हिटविकेट झाला.

    १६९ धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या इंग्लंडने सुरुवातीपासून स्फोटक फलंदाजी सुरु ठेवली. कर्णधार जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी पहिल्या ओव्हरपासून चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत धावसंख्या वाढवत ठेवली. बटलरने ४९ चेंडूत नाबाद ८० धावा तर हेल्सने ४७ चेंडूत नाबाद ८६ धावा केल्या. ज्यामुळे अवघ्या १७ षटकातंच त्यांनी हे आव्हान पार करत सामना खिशात घातला. यासामन्यात भारताच्या एकाही गोलंदाजांला चांगली गोलंदाजी करून विकेट मिळवता आली नाही.