ICC World Cup 2023 England vs Netherlands
ICC World Cup 2023 England vs Netherlands

  ICC World Cup 2023 England vs Netherlands : प्रथम फलंदाजीला उतरलेल्या इंग्लडच्या संघाने नेदरलॅंड समोर 339 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. इंग्लडकडून बेन स्टोक्स आणि मॅलनने सर्वाधिक धावा करीत इंग्लडच्या धावसंख्येला आकार दिला. सलामीला आलेल्या बेरिस्टो आणि मॅलनने डावाची सुरुवात केली परंतु बेरिस्टो लवकरच बाद झाला. त्यानंतर जो रूट नेदरलॅंडच्या वॅन बिकच्या चेंडूवर लवकरच बाद झाला. मग, मॅलन आणि बेन स्टोक्सने दमदार खेळी करीत यांनी चांगली भागीदारी करीत इंग्लची धावसंख्येत भर टाकली. त्यानंतर इंग्लडकडून ख्रिस व्होक्स वगळता एकही फलंदाज प्रभावी ठरू शकला नाही.

  नेदरलँड्सची बॅटिंग

  नेदरलँड्सकडून फक्त 5 जणांनाच दुहेरी आकडा गाठता आला. त्यापैकी तिघांनाचा तिशीपार मजल मारता आला. दोघे भोपळा न फोडता आले तसेच गेले. तर चौघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. नेदरलँड्सकडून तेजा निदामनारु याने सर्वाधिक नाबाद 41 धावांची खेळी केली. कॅप्टन स्कॉट एडवर्ड्स याने 38, वेस्ली बॅरेसी याने 37 आणि सायब्रँड एंजेलब्रेक्ट याने 33 धावांचं योगदान दिलं. कॉलिन अकरमन आणि रोएलॉफ व्हॅन डर मर्वे या दोघांना खातंही उघडता आलं नाही. तर मॅक्स ओडोड 5, पॉल व्हॅन मीकरेन 4, लोगान व्हॅन बीक 2 आणि आर्यन दत्त 1 धावा करुन आऊट झाले.

  इंग्लंड नवव्या क्रमांकावर

  इंग्लंड क्रिकेट टीमने या विजयासह पॉइंट्स टेबलमधून दहाव्या स्थानावरुन नवव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. इंग्लंड आणि नेदरलँड्स आणि इंग्लंड दोन्ही संघांचे समसमान 4 पॉइंट्स आहेत. मात्र नेदरलँड्सच्या तुलनेत इंग्लंडचा नेट रनरेट चांगला असल्याने इंग्लंड नवव्या क्रमांकावर पोहचली आहे.

  इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, गेस ऍटकिन्सन आणि आदिल रशीद.

  नेदरलँड्स प्लेईंग ईलेव्हन | स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओडोड, कॉलिन अकरमन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, बास डी लीडे, तेजा निदामनुरु, लोगान व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त आणि पॉल व्हॅन मीकरेन.