पाकिस्तान विरुद्ध पहिल्याच दिवशी इंग्लंडने उभारला ५०६ धावांचा डोंगर; मोडला ११२ वर्षांचा रेकॉर्ड

इंग्लंडचे फलंदाज जॅक क्रॉलीनं (१२२ धावा) ऑली पोप (१०८ धावा), बेन डकेटनं (१०७ धावा) आणि हॅरी ब्रूकनं नाबाद १०१ धावा ठोकल्या. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

    तब्बल १७ वर्षांनी इंग्लंडचा संघ पाकिस्तान विरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानच्या भूमीत पोहोचला आहे. रावलपिंडी क्रिकेट स्टेडियमर (Rawalpindi Cricket Stadium) हा सामान खेळवला गेला असून पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी इंग्लंडनं पाकिस्तानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. इंग्लंडनं पहिल्या दिवशी ७५ षटकांत चार विकेट गमावून ५०६ धावा केल्या आहेत. इंग्लंडच्या चार फलंदाजांनी शतक झळकावले असून त्यांनी ऑस्ट्रेलियाचा ११२ वर्षाचा विक्रम मोडीत काढला आहे.

    इंग्लंडचे फलंदाज जॅक क्रॉलीनं (१२२ धावा) ऑली पोप (१०८ धावा), बेन डकेटनं (१०७ धावा) आणि हॅरी ब्रूकनं नाबाद १०१ धावा ठोकल्या. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी क्रीझवर येताच पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई करण्यास सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ३५. ४ षटकांत २३३ धावांची भागीदारी केली. डकेट ११० चेंडूत १०७ धावा करून बाद झाला. त्यानं आपल्या खेळीत 15 चौकार मारले. डकेट बाद झाल्यानंतर क्रॉलीही काही वेळातच पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानं १११ चेंडूत २१ चौकारांच्या मदतीनं १२२ धावांची खेळी केली.