इंग्लंडचा टॉस जिंकून फिल्डींगचा निर्णय ; टीम इंडिया करणार प्रथम बॅटींग, ओपनिंगला पहिली कोणाला संधी मिळणार?

इंग्लंडने नाणेफेक जिंकली असून त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम इंडिया सुरूवातीलाच फलंदाजी करणार आहे. परंतु ओपनिंगला पहिली संधी कोणाला मिळणार ? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नसून क्रिकेट प्रेमींमध्ये प्रचंड उत्साह वाढला आहे. दरम्यान, या सामन्याला दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

    पुणे : टीम इंडिया विरूद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्याला आता थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

    प्रथमता टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात नाणेफेक उडवण्यात आला. यामध्ये इंग्लंडने नाणेफेक जिंकली असून त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम इंडिया सुरूवातीलाच फलंदाजी करणार आहे. परंतु ओपनिंगला पहिली संधी कोणाला मिळणार ? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नसून क्रिकेट प्रेमींमध्ये प्रचंड उत्साह वाढला आहे. दरम्यान, या सामन्याला दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

    असा असेल उभय संघ :

    टीम इंडिय़ा : रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, शार्दूल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा

    इंग्लंड : जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, इयॉन मॉर्गन, जोस बटलर, बेन स्टोक्स, सॅम बिलिंग, मोइन अली, सॅम कुरन, टॉम कुरन, आदिल राशिद, मार्क वूड