समलिंगी संबंधांच्या समर्थनार्थ ८ संघ, इंग्लिश कर्णधार बँड घालून खेळणार

यावर फिफाने सांगितले की, 'जर संघ किंवा खेळाडूंनी असे केले तर ते नियमांचे उल्लंघन असेल. फिफा खेळाडूंवर बंदीही घालू शकते. इंग्लंडचा कर्णधार हॅरि केन आणि संपूर्ण संघ LGBT+ समुदायाच्या समर्थनार्थ 'वन लव्ह' बँड परिधान करून सामन्यात प्रवेश करणार आहे. समलैंगिक संबंधांवर बंदी असलेल्या इस्लामिक देश इराणविरुद्ध आज इंग्लंडचा पहिला सामना आहे.

    नवी दिल्ली – आधीच वादांच्या भोवऱ्यात अडकलेल्या फिफा विश्वचषकात आता LGBT+ वाद सुरू झाला आहे. सामन्यादरम्यान इंग्लंडसह ८ संघांनी समलिंगी संबंधांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडचा कर्णधार हॅरि केन म्हणाला की, ‘इराणविरुद्धच्या त्याच्या पहिल्या सामन्यात तो इंद्रधनुष्य बँड घालेल, जो LGBT+ समुदायाचे प्रतीक आहे.’

    यावर फिफाने सांगितले की, ‘जर संघ किंवा खेळाडूंनी असे केले तर ते नियमांचे उल्लंघन असेल. फिफा खेळाडूंवर बंदीही घालू शकते. इंग्लंडचा कर्णधार हॅरि केन आणि संपूर्ण संघ LGBT+ समुदायाच्या समर्थनार्थ ‘वन लव्ह’ बँड परिधान करून सामन्यात प्रवेश करणार आहे. समलैंगिक संबंधांवर बंदी असलेल्या इस्लामिक देश इराणविरुद्ध आज इंग्लंडचा पहिला सामना आहे. दोहा येथे फिफा विश्वचषक होत आहे, तिथेही समलैंगिक संबंधांवर बंदी आहे. येथून वादाला सुरुवात झाली.

    हॅरि केन म्हणाला की, ‘एक टीम, कर्मचारी आणि संस्था म्हणून आम्ही हे स्पष्ट केले आहे की, आम्हाला वन लव्ह आर्म बँड घालायचे आहेत. फिफाशी चर्चा सुरू असून ते आम्हाला सामन्यापूर्वी निर्णय कळवतील. आम्ही आमची इच्छा स्पष्ट केली आहे.