पहिल्या दोन सामन्यांत दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर मात केली. त्यानंतर भारतीय संघ दबावात होता. अशा दबावाच्या स्थितीतही भारतीय संघाने तिसऱ्या आणि चौथ्या टी20 सामन्यात विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधली. या मालिकेतील चौथ्या सामन्यात सुरुवातीला भारतीय फलंदाजांनी निराश केले. मात्र, अशा वेळी संघाच्या संघाला दिनेश कार्तिक आणि हार्दिक पंड्याच्या जोडीने सावरले. या खेळीबद्दल हार्दिक पांड्याने त्याचे मत व्यक्त करताना माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीमुळे कसा विजय मिळविला याचे गूपित उघड केले आहे(Even after retirement, Mahendra Singh Dhoni led Team India to victory).

    बंगळुरू : पहिल्या दोन सामन्यांत दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर मात केली. त्यानंतर भारतीय संघ दबावात होता. अशा दबावाच्या स्थितीतही भारतीय संघाने तिसऱ्या आणि चौथ्या टी20 सामन्यात विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधली. या मालिकेतील चौथ्या सामन्यात सुरुवातीला भारतीय फलंदाजांनी निराश केले. मात्र, अशा वेळी संघाच्या संघाला दिनेश कार्तिक आणि हार्दिक पंड्याच्या जोडीने सावरले. या खेळीबद्दल हार्दिक पांड्याने त्याचे मत व्यक्त करताना माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीमुळे कसा विजय मिळविला याचे गूपित उघड केले आहे(Even after retirement, Mahendra Singh Dhoni led Team India to victory).

    चौथ्या सामन्यांत एकावेळी भारताची स्थिती 4 बाद 81 धावा अशी होती. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिकने सुरुवातीला संयमी खेळी करत डाव सावरला आणि नंतर शेवटच्या षटकात तडाखेबाज फलंदाजी केली. यावेळी हार्दिकला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने दिलेल्या मुलमंत्राचा फायदा झाला असल्याचे हार्दिकने सांगितले.

    दिनेश कार्तिकने सामना संपल्यानंतर हार्दिकची विशेष मुलाखत घेतली. यावेळी कार्तिकने पांड्याला त्याच्या खेळीबद्दल प्रश्न विचारला. ज्याचे उत्तर देताना पांड्या म्हणाला की, मी एकदा धोनीला विचारले होते, तू दबावाची परिस्थिती कशी हाताळतो?, त्यावर त्याने उत्तर दिले की, स्वत:च्या धावांचा विचार न करता संघाला काय गरजेचे आहे त्यावर लक्ष केंद्रीत करायचे. आणि आता मला त्याचा फायदा झाला, असे पांड्या म्हणाला.