प्रसिद्ध फुटबॉलपटू पेले यांची प्रकृती खालावली! मुलाने फोटो ट्विट करत लिहिला भावपूर्ण संदेश

पेलेने आपला देश ब्राझीलला तीन वेळा वर्ल्ड चॅम्पियन बनवले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ब्राझीलने 1958, 1962 आणि 1970 मध्ये विश्वचषक जिंकला होता. पेलेन यांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत एकूण 1363 सामने खेळले आणि 1281 गोल केले.

    मुंबई : फुटबॉल जगतातील महान फुटबॉलपटू पेले यांची प्रकृती चिंताजनक असून ती सातत्याने खालावत असल्याची माहिती मिळत आहे. ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले हे कर्करोगाशी झुंज देत आहेत.

    जगप्रसिद्ध खेळाडू पेले यांची सप्टेंबर 2021 मध्ये कोलन ट्यूमर काढण्यात आली. त्यानंतर त्यांची केमोथेरपी झाली. पेले यांना यापूर्वीही अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.काही दिवसांपूर्वी पेले यांना रुटीन चेकअप करीता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पेले यांना कर्करोगासोबत हृदयविकाराचा देखील आजार असल्यामुळे त्यांना चेकपनंतर घरी न पाठवता रुग्णालयातच दाखल करण्यात आले होते.

    रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, 82 वर्षीय माजी फुटबॉलपटू पेले यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. पेले यांचा मुलगा एडसन चोल्बी नॅसिमेंटो शनिवारी रुग्णालयात दाखल झाला, अशी माहिती एपी वृत्तसंस्थेने दिली. पेले यांची मुलगी केली नॅसिमेंटोही रुग्णालयात आहे. पेलेच्या मुलाने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट पोस्ट केली, ज्यामध्ये त्याने, “पापा… माझी ताकद तुम्ही आहात.” असं लिहीलं आहे. पेले यांची प्रकृती सातत्याने खालावत चालली असून, त्यांच्या किडनी आणि हृदयावर परिणाम होत आहे.

    ब्राझीलला तीन वेळा बनवलं चॅम्पियन

    पेलेने आपला देश ब्राझीलला तीन वेळा वर्ल्ड चॅम्पियन बनवले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ब्राझीलने 1958, 1962 आणि 1970 मध्ये विश्वचषक जिंकला होता. 1958 च्या विश्वचषक फायनलमध्ये सुदान विरुद्ध दोन गोल केले. पेलेन यांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत एकूण 1363 सामने खेळले आणि 1281 गोल केले. त्यांनी ब्राझीलसाठी 91 सामन्यात 77 गोल केले आहेत.