चाहत्यांनी भारतीय संघातील “या” खेळाडूंची पूजा करणं बंद करावे

    भारताचा माजी सलामीवीर आणि सध्याचा समालोचक असलेल्या गौतम गंभीर हा नेहेमीच त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहतो. त्याने पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटमधील (Indian Cricket) ‘हिरो’ संस्कृतीवर टीका केली आहे. भारतीय क्रिकेट (Indian Cricket) चाहत्यांनी ठरावीक खेळाडूंची पूजा करणे बंद करावे, अन्यथा क्रिकेटचे भले होणार नाही, असा इशाराच गौतम गंभीरने (gautam gambhir) दिला आहे.

    भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूला हिरो (Hero) बनवण्याच्या संस्कृतीवर गौतम गंभीरने (gautam gambhir) जोरदार टीका केली आहे. विराट कोहली (virat kohli), महेंद्रसिंह धोनीबद्दल (mahendra singh dhoni) चाहत्यांना जशी उत्कटता आहे, तशीच इतर खेळाडूंसाठीही असली पाहिजे, असे मत गंभीरने मांडले. भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये (dressing room) तुम्ही राक्षस निर्माण करू नका, आधी एमएस धोनी (MS Dhoni) होता आणि आता विराट कोहली (virat kohli) आहे. मात्र एकच राक्षस असावा, तो म्हणजे भारतीय क्रिकेट (indian cricket), खेळाडू नाही, असे स्पष्ट मत गंभीरने व्यक्त केले.

    गौतम गंभीर म्हणाला की, “जेव्हा तुम्ही एखाद्याची पूजा करायला सुरुवात करता तेव्हा त्याच्यासोबत खेळणारे अनेक खेळाडू तिथेच संपतात आणि पुढे जाऊ शकत नाहीत. आधी महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) होता आणि आता विराट कोहली आहे. जेव्हा विराट कोहलीने टी-20 सामन्यात शतक झळकावले तेव्हा भुवनेश्वर कुमारच्या (bhuvneshwar kumar) दमदार स्पेलबद्दल कोणीही बोललं नाही. कॉमेंट्रीमध्ये (commentary) मी एकटाच होतो जो वारंवार नमूद करायचो की चार षटकांत ४ धावा देऊन ५ बळी घेणे सोपे नाही. भारताला (India) एखाद्या खेळाडूची पूजा करण्याच्या वृत्तीमधून बाहेर यावं लागेल. तुम्हाला फक्त भारतीय क्रिकेटलाच (cricket) सर्वात मोठं समजावे लागेल,” असेही गौतम गंभीर म्हणाला.