फुटबॉल लव्हर भावूक, भारतीय कर्णधार सुनील छेत्रीचा अलविदा, कधी खेळणार शेवटचा सामना

सुनील छेत्रीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून निवृत्तीची घोषणा केली आहे. यामध्ये तो भावुक होताना दिसला.

    सुनील छेत्री : भारतीय संघाचा कर्णधार 2005 मध्ये करिअरला सुरुवात केली होती. सुनील छेत्रीने (Sunil Chhetri) मार्चमध्ये गुवाहाटी येथे अफगाणिस्तानविरुद्ध भारतासाठी 150 वा सामना खेळला. त्या सामन्यात त्याने एक गोल केला आणि तो सामना भारताने 1-2 ने गमावला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यामध्ये भारतीय फुटबॉल संघाचा स्टार खेळाडू आणि कर्णधार सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. कुवेतविरुद्धच्या फिफा विश्वचषक पात्रता फेरीनंतर तो आंतरराष्ट्रीय फुटबॉलला कायमचा निरोप देणार आहे असे त्याने व्हिडीओमध्ये सांगितले आहे.

    कर्णधार सुनील छेत्रीने आतापर्यंत भारतासाठी 150 सामने खेळले आहेत आणि त्याच्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत २६ मार्चपर्यत 94 गोल केले आहेत. सुनीलने 9 मिनिटे 51 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये निवृत्ती घेण्याच्या निर्णयाबद्दल सांगितले. X वर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये सुनीलने लिहिले की, मला तुम्हाला काही सांगायचे आहे.. असे त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे आणि व्हिडीओ शेअर केला आहे.

    आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करण्याच्या यादीमध्ये सुनील छेत्री चौथ्या स्थानावर आहे. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याच्या बाबतीत पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो पहिल्या स्थानावर आहे. रोनाल्डोने आतापर्यंत 206 सामने खेळले असून एकूण 128 गोल केले आहेत. यानंतर इराणचा माजी खेळाडू अली दाई आहे, ज्याने 148 सामन्यांत 108 गोल केले आहेत. अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीने 106 गोल केले आहेत आणि त्याने आतापर्यत 180 सामने खेळले असून तो तिसऱ्या स्थानावर आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा सुनील छेत्री हा दुसरा आशियाई खेळाडू आहे. या बाबतीत इराणचा अली दाई पहिल्या क्रमांकावर आहे.