पहिल्या सामन्यासाठी विराटसेना सज्ज, टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड भिडणार

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियमध्ये या मॅचचे आयोजन करण्यात आले आहे. उभय संघात आतापर्यंत एकूण १०० एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये टीम इंडिया इंग्लंडवर वरचढ आहे.

    पुणे : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज (मंगळवार) पहिला एकदिवसीय (India vs England 1st ODI) सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

    पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियमध्ये या मॅचचे आयोजन करण्यात आले आहे. उभय संघात आतापर्यंत एकूण १०० एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये टीम इंडिया इंग्लंडवर वरचढ आहे.

    भारताने इंग्लंडचा ५३ सामन्यात धुव्वा उडवला आहे. तर इंग्लंडने टीम इंडियावर ४२ मॅचमध्ये विजय मिळवला आहे.२ सामने बरोबरीत सुटले आहेत. तर ३ सामन्यांचा निकाल लागला नाही. या एकदिवसीय मालिकेत टीम इंडिया ही कामगिरी कायम राखणार की इंग्लंड हा इतिहास बदलणार याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.