पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, ‘वाचा’ भारतीय संघात ‘या खेळाडूना’ मिळाली संधी

टॉस झाल्यावर भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आपला संघ जाहीर केला. तसेच काही संघात बदल सुद्धा केले आहेत. ट्वेन्टी-२० मालिका संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार असल्याची माहिती यावेळी समोर आली होती. पण आता या मालिकेतील सामन्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.

    मोहाली : आशिया स्पर्धेतील (Asia cup) भारतीय संघाची निराशजनक कामगिरीनंतर आज पुन्हा नव्याने भारतीय संघ (Indian team) कांगारुसमोर (Australia) उभा ठाकला आहे. आज मोहाली येथे पहिला टी-20 सामना होत आहे. (first t-20 match) तीन सामन्याच्या मालिकेतील आज पहिला सामना होत आहे. पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्याचा टॉस ऑस्ट्रेलियाने जिंकला. (Australia won toss) ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत यावेळी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टॉस झाल्यावर भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आपला संघ जाहीर केला. तसेच काही संघात बदल सुद्धा केले आहेत. ट्वेन्टी-२० मालिका संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार असल्याची माहिती यावेळी समोर आली होती. पण आता या मालिकेतील सामन्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.

    दरम्यान, सलामीचा सामना जिंकून मनोबल वाढविण्यासाठी पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात काही मोठे बदल करण्यात आलेत. भारतीय संघात अक्षर पटेल आणि युजवेंद्र चहल हे दोन्ही फिरकीपटू असतील. तर या सामन्यासाठी भारतीय संघात हर्षल पटेलला संधी देण्यात आली आहे. तसेच विकेटकिपर दिनेश कार्तिक की पंत अशी चर्चा झाली असताना, रिषभ पंतला पसंती देण्याती आली आहे. तसेच केएल राहूल, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव यांनी संघातील स्थान कायम ठेवले आहे.

    भारताचा संभाव्य संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव , हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

    ऑस्ट्रेलियाचा संभाव्य संघ : ॲरॉन फिंच (कर्णधार), स्टीव्हन स्मिथ, टीम डेव्हिड, ग्लेन मॅक्सवेल, ॲश्टन अगर, कॅमेरॉन ग्रीन, डॅनियल सॅम्स, शॉन ॲबॉट, जोश इंग्लिस, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, केन रिचर्डसन, ॲडम झाम्पा, नॅथन एलिस.