IPL च्या पाच महिला टीमचा होणार लिलाव, BCCI करणार 4000 कोटींपेक्षा अधिकची कमाई, मोठमोठे उद्योगपती लावणार बोली

पाच महिला IPL टीमच्या खरेदीसाठी मोठ्या उद्योगांच्या घराण्यात चुरस पाहयला मिळणार आहे. यात अदानी ग्रुप, टोरंट समूह, हल्दीराम, कैपरी ग्लोबल, कोटक, आदित्य बिर्ला ग्रुप इत्यादी क़र्पोरेट घराण्यांचा समावेश असेल. गेल्या वर्षी बीसीसीआयनं दोन पुरुष टीमचा लिलाव केला होता, त्यात पुरेसं यश बीसीसीआयच्या हाती लागलेलं नव्हतं.

    मुंबई- देशातील टॉप बिझनेस टायकून्स बुधवारी भारतीय महिला IPL टीमसाठी बोली लावणार आहेत. पाच महिला IPLटीमसाठी सुमारे 4000 कोटींहून अधिकची बोली लागण्याची शक्यता आहे. ही सगळी कमाई BCCIला मिळणार आहे. IPLच्या तज्ज्ञांच्या माहितीनुसार प्रत्येक महिला टीमवर किमान 500 ते 600 कोटींची बोली लागण्याची शक्यता आहे. या बोलीसाठी अदानी, कोटक, हल्दीराम यासारखी उद्योगांची घराणी मैदानात उतरतील. यातील अनेक उद्योजक हे महिला टीम खरेदी करण्यासाठी उत्सुक असल्याची माहिती आहे.

    BCCI करणार कोट्यवधींची कमाई

    भारतीय क्रिकेट नियामक आय़ोग पाच महिला IPL टीमसाठी लिलाव आयोजित करणार आहे. साधारणपणे या लिलावानंतर बीसीसीआयला किमान 4000 कोटींपेक्षा जास्त रक्कम मिळेल असा अंदाज वर्तवण्यात येतोय. या लिलावासाठी 30 हून अधिक कंपन्यांनी पाच लाख रुपयांहून अधिक किमतीचे लिलावाचे कागदपत्रं खरेदी केल्याची माहितीये.

    कोणकोणती उद्योजकांची घराणी रिंगणात

    पाच महिला IPL टीमच्या खरेदीसाठी मोठ्या उद्योगांच्या घराण्यात चुरस पाहयला मिळणार आहे. यात अदानी ग्रुप, टोरंट समूह, हल्दीराम, कैपरी ग्लोबल, कोटक, आदित्य बिर्ला ग्रुप इत्यादी क़र्पोरेट घराण्यांचा समावेश असेल. गेल्या वर्षी बीसीसीआयनं दोन पुरुष टीमचा लिलाव केला होता, त्यात पुरेसं यश बीसीसीआयच्या हाती लागलेलं नव्हतं. आता या कंपन्या महिला टीम खरेदी करण्यासाठी उत्सुक असल्याचं दिसतंय. काही मेन्स IPL टीमचे मालकही यात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.