एका खेळाडूने एकाच दिवसात  विराट कोहलीच्या तीनपट पैसे कमावले; आलिशानगाड्या, 334 कोटींचे प्रयव्हेट जेट

क्रिकेट, फुटबॉल असो टीममधील खेळाडुंची प्रति सामना कमाई रग्गड असतेच यात संशयच नाही. क्रिकेटपटूंच्या मिळकतीबाबत फोर्ब्सद्वारे नेहमीच आकडेवारी प्रसिद्ध केली जात असते. या यादीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली श्रीमंत क्रिकेटपटू असून त्याचे वार्षिक उत्पन्न 196 कोटी रुपये आहे. तथापि, एका खेळाडूने एकाच दिवसात चक्क विराट कोहलीच्या तीनपट पैसे कमावून नवा विक्रम स्थापन केला आहे. फ्लॉयड मेवेदर असे या खेळाडूचे नाव असून तो अमेरिकेचा व्यावसायिक बॉक्सर आहे. त्याने एकाच दिवसात तब्बल 742 कोटींची कमाई केली आहे.

  दिल्ली : क्रिकेट, फुटबॉल असो टीममधील खेळाडुंची प्रति सामना कमाई रग्गड असतेच यात संशयच नाही. क्रिकेटपटूंच्या मिळकतीबाबत फोर्ब्सद्वारे नेहमीच आकडेवारी प्रसिद्ध केली जात असते. या यादीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली श्रीमंत क्रिकेटपटू असून त्याचे वार्षिक उत्पन्न 196 कोटी रुपये आहे. तथापि, एका खेळाडूने एकाच दिवसात चक्क विराट कोहलीच्या तीनपट पैसे कमावून नवा विक्रम स्थापन केला आहे. फ्लॉयड मेवेदर असे या खेळाडूचे नाव असून तो अमेरिकेचा व्यावसायिक बॉक्सर आहे. त्याने एकाच दिवसात तब्बल 742 कोटींची कमाई केली आहे.

  बनावट लढत

  मेवेदर याने याबबातची माहिती इन्स्टाग्रामवरून दिली आहे. तथापि त्याने ज्या लढतीत भाग घेतला होता ती लढतच मुळात बनावट होती असेही त्याने स्पष्टीकरण दिले आहे. तथापि याच बनावट लढतीद्वारे त्याने 100 मिलियन डॉलर कमावले असल्याचाही दावा केला.

  मेवेदर आणि लॉगन पॉल यांच्यात 6 जूनला लढत झाली होती. हा सामना 8 राऊंडपर्यंत चालला. या सामन्यात मेवेदरला युट्यूबर लॉगन पॉलला नॉक आऊटही करता आले नव्हते. मेवेदरने त्याच्या बॉक्सिंग करियरमध्ये एकही सामना गमावलेला नाही.

  2017 मध्ये त्याने निवृत्ती घेतली होती. आपल्या करियरमध्ये त्याने सगळ्या 50 सामन्यात विजय मिळविला होता. मेवेदरने 2020 पर्यंत 450 मिलियन डॉलर कमावले होते, पण यावर्षी मे महिन्यात त्याने करियरमध्ये 1.2 बिलियन डॉलर म्हणजेच 89.13 अब्ज रुपयांची कमाई केल्याचा दावा केला होता.

  दर याने आपल्या एकूण बॉक्सिंग कारकिर्दीमध्ये एकही सामना गमावलेला नाही. मेवेदर याने 2017 मध्ये निवृत्तीची घोषणा केली होती. लक्झरी गाड्यांची हौस असणाऱ्या मेवेदर याच्याकडे त्याचे खासगी विमानही आहे. या विमानाची किंमत जवळपास 334 कोटी रुपये आहे. मेवेदर अनेक आलीशान गाड्यांचा मालकही आहे. त्याच्याकडे बुगाटी ग्रॅण्ड स्पोर्ट, बुगाटी वेरॉन, लॅम्बॉर्गिनी एवेंटेडॉर, फेरारी 599 जीटीबी फियोरानो यांच्यासारख्या गाड्या आहेत. याशिवाय त्याच्याकडे अनेक रोल्स रॉयस आणि बेंटलेही आहेत.