एफसी गोवाच्या सहयोगी प्रायोजकपदी पुन्हा एकदा ओक्समिथ गोल्ड, येत्या तीन वर्षांसाठी केला नवा करार

संपूर्ण भारतातल्या महत्वाच्या बाजारपेठांतील जाहिरातींमध्ये एफसी (FC Goa) गोवाचा लोगो आणि प्रमुख खेळाडूचे फोटो ओक्समिथ गोल्डला (Oaksmith Gold) वापरता येतील.

  • एफसी गोवाच्या जर्सीवर ओक्समिथ गोल्ड क्लबचा लोगो होणार उजव्या बाजूला विराजमान

मुंबई : सहयोगी प्रायोजक म्हणून एफसी गोवा (FC Goa) आणि ओक्समिथ गोल्ड (Oaksmith Gold) पुढच्या तीन वर्षासाठी म्हणजे २०२४ च्या उन्हाळ्यापर्यंत एकमेकांशी जोडले गेले आहेत. ओक्समिथ गोल्ड चा लोगो (Logo) एफसी गोवाच्या मॅच डे टी शर्टवर दिसेल. शिवाय, ओक्समिथ गोल्ड एफसी गोवा सोबत सोशल मीडिया (Social Media) चॅनेलवर चित्तवेधक डिजिटल साहित्य तयार करणार आहे.

संपूर्ण भारतातल्या महत्वाच्या बाजारपेठांतील जाहिरातींमध्ये एफसी (FC Goa) गोवाचा लोगो आणि प्रमुख खेळाडूचे फोटो ओक्समिथ गोल्डला (Oaksmith Gold) वापरता येतील. यावेळी बोलताना एफसी गोवा अध्यक्ष अक्षय टंडन म्हणाले, “ऑक्समिथ गोल्डसोबत आमची भागीदारी दुसऱ्या सत्रासाठी वाढवताना आम्हाला खूप आनंद होत आहे. एकत्र असताना आमचा पहिला सीझन लाभदायी होता, दोन्ही ब्रँड्समध्ये उत्तम संबंध निर्माण झाले. ह्याचा हा पुरावा आहे.

आमचा एकत्र प्रवास असाच सुरु ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू. एफसी गोवा आणि ओक्समिथ गोल्ड हे आपआपल्या क्षेत्रात उत्तम प्रगती करत असल्याने त्याचे एकत्र भविष्य खूप उज्वल आहे.