सातवर्षांत पहिल्यांदाच IPLच्या ब्रँडला धक्का, कोणत्या संघाला किती झालं नुकसान, जाणून घ्या

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात आला होता. त्यामुळे आयपीएलच्या ब्रँड व्हँल्यूला मोठा धक्का बसला असून ३.६ टक्क्यांचा फरक पडला आहे. सामन्यावेळी प्रेक्षकांच्या खाण्या-पिण्याच्या नियोजनाची विक्री २० टक्क्यांपर्यंत होते. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अधिक तोटे सहन करावे लागले होते. मात्र, प्रसारक माध्यमांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला.

    टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात टी-२० सामन्याची सुरूवात झाली आहे. या मालिकेनंतर एकदिवसीय मालिकेला सुरूवात होणार आहे. त्यानंतर ९ एप्रिलपासून आयपीएलच्या सामन्याला सुरूवात होणार आहे. म्हणजे जवळपास पाच महिन्यानंतर पुन्हा एकदा जिओ धन धना धन.. आणि आयपीएलची धुंद कानावर पडणार आहे.

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२० प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात आला होता. त्यामुळे आयपीएलच्या ब्रँड व्हँल्यूला मोठा धक्का बसला असून ३.६ टक्क्यांचा फरक पडला आहे. सामन्यावेळी प्रेक्षकांच्या खाण्या-पिण्याच्या नियोजनाची विक्री २० टक्क्यांपर्यंत होते. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अधिक तोटे सहन करावे लागले होते. मात्र, प्रसारक माध्यमांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला.

    चेन्नई आणि कोलकाता संघाला मोठा फटका

    आयपीएल २०२० च्या स्पर्धेत चेन्नई आणि कोलकाता संघाला मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. चेन्नईच्या ब्रँड व्हल्यूमध्ये १६.५ टक्क्यांनी घट झाली आहे. तर कोलकाता संघाला १३.७ टक्क्यांनी घट झाली आहे. कारण या संघांमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक खेळाडूंनी माघार घेतली होती. आयपीएलच्या इतिहासात चेन्नईचं प्रदर्शन खूप वाईट अवस्थेत असताना पाहायला मिळालं. तसेच कोलकाता संघाच्या प्रदर्शनात देखील वाईट परिणाम दिसून आले होते.