फिफा विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच महिला रेफरी उतरणार मैदानावर

कुठल्याही स्पर्धेचे सामने सुरळीतपणे पार पाडण्याची जबाबदारी ही रेफरींची असते. 2022 मध्ये कतार येथे होणार्‍या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी ‘फिफा’ने रेफरी, सहाय्यक रेफरी आणि व्हिडिओ सामनाधिकारी यांची घोषणा नुकतीच केली. यावेळी पहिल्यांदाच महिला रेफरींचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

    यंदा कतार मध्ये सुरु असलेला फिफा विश्वचषक अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला. फुटबॉल सामन्यावेळी महिलांनी कोणते कपडे परिधान करावेत यावर देखील बंधने आली या निर्णयावर मोठयाप्रमाणात टीका देखील झाली. मात्र आता कतारने या टीकेला फाटा देत फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी तीन महिला रेफरींची नेमणूक केली आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या सहायक रेफरीही महिलाच आहेत.

    कुठल्याही स्पर्धेचे सामने सुरळीतपणे पार पाडण्याची जबाबदारी ही रेफरींची असते. 2022 मध्ये कतार येथे होणार्‍या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी ‘फिफा’ने रेफरी, सहाय्यक रेफरी आणि व्हिडिओ सामनाधिकारी यांची घोषणा नुकतीच केली. यावेळी पहिल्यांदाच महिला रेफरींचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

    स्टेफनी फ्रापार्ट (फ्रान्स), सलीमा मुकानसांगा (रवांडा) आणि योशिमी यामाशिता (जपान) यांचा समावेश आहे. या तिघींशिवाय नुजा बेक (ब्राझील), कॅरेन डायझ मेडिना (मेक्सिको) आणि कॅथरीन नेस्बिट (अमेरिका) यांन सहाय्यक पंच म्हणून निवडण्यात आले आहे.