भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाणला कोरोनाची लागण

इरफानने ट्वीट केले की, कोणतीही लक्षणे नसताना मी कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आलो आहे. मी स्वत: ला घरीच आयसोलेट केले आहे. माझ्याशी संपर्क साधलेल्यांनी चाचणी करावी. मी सर्वांना विनंती करतो की मास्क घाला आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा. स्वत: ची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. असं इरफानने सांगितलं आहे.

    भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाणला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. इरफानने स्वत: सोमवारी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.

    इरफानने ट्वीट केले की, कोणतीही लक्षणे नसताना मी कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आलो आहे. मी स्वत: ला घरीच आयसोलेट केले आहे. माझ्याशी संपर्क साधलेल्यांनी चाचणी करावी. मी सर्वांना विनंती करतो की मास्क घाला आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा. स्वत: ची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. असं इरफानने सांगितलं आहे.

    दरम्यान, इरफानच्या अगोदर एस. बद्रीनाथ, सचिन तेंडुलकर आणि युसूफ पठाण यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. हे सर्व खेळाडू छत्तीसगडच्या रायपूरमध्ये पार पडलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजचा विजेता संघ इंडिया लेजेंड्सचा भाग होते.