धक्कादायक! सामन्यानंतर जल्लोष करताना खेळाडूला हृदयविकाराचा झटका, ग्राऊंडवरच घेतला अखेरचा श्वास!

रुग्णालयाचे डीन डॉ. मनोज कुमार म्हणाले की, खेळाडूला रुग्णालयात आणले असता तो मरण पावला होता आणि पोस्टमार्टमनंतर सर्व काही समोर येईल.

    क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कर्नाटकचा खेळाळू कें. होयसाला (K Hoysala) याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. तो 34 वर्षांचा होता. बेंगळुरू येथील आरएसआय क्रिकेट मैदानावर कर्नाटक विरुद्ध तामिळनाडू सामना झाल्यानंतर ही घटना घडली. कर्नाटकच्या विजयाचा आनंद साजरा करत असताना अचानकत होयसला छातीत दुखू लागले आणि ते बेशुद्ध झाले. रुग्णालयाच नेल्यावर त्याला डॅाक्टरांनी मृत घोषीत केलं.

    रुग्णालयात नेण्यापुर्वीच मृत्यू

    मिळालेल्या माहितीनुसार, 22 फेब्रुवारीला ही घडली, मात्र 23 फेब्रुवारीच्या संध्याकाळी याची माहिती समोर आली. रुग्णालयाचे डीन डॉ. मनोज कुमार यांनी सांगितले की, त्याला रुग्णालयात आणले असता त्याला मृत्यू झाला होता. आता पोस्टमार्टमनंतर सर्व काही समोर येईल. या बातमीने भारतीय क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. आरोग्यमंत्र्यांनीही शोक व्यक्त केला असून या कठीण काळात मी त्यांच्या कुटुंबासोबत असल्याचे सांगितले आहे.

    होयसाला मधल्या फळीत फलंदाजी करत होता आणि तो चांगला गोलंदाजही होता. होयसला यांनी 25 वर्षांखालील गटात कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व केले आणि कर्नाटक प्रीमियर लीगचाही भाग होता.