पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियाने रोनाल्डो याने गोल झळकावला आणि संघाला १ गोलची आघाडी मिळवून दिली. मात्र त्यानंतर केलेल्या चुका अंगाशी आल्या. सामन्याच्या ३५ व्या मिनिटाला पोर्तुगालच्या रुबेन डायसने स्वगोल केल्याने जर्मनीला १-१ ने बरोबरी साधता आली.
यूरो कप २०२० स्पर्धेतील खडतर अशा ‘फ’ गटातील सामन्यात जर्मनीने गतविजेत्या पोर्तुगालचा धुव्वा उडवला. या सामन्यात पोर्तुगालला दोन स्वगोल महागात पडले. त्यामुळे जर्मनीने पोर्तुगालचा ४-२ ने पराभव केला. पहिल्या सामन्यात मिळालेल्या विजयानंतर पोर्तुगालचा आत्मविश्वास दुणावला होता. मात्र जर्मनीविरुद्धच्या सामन्यात केलेल्या चुका पोर्तुगालला भोवल्या.
पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियाने रोनाल्डो याने गोल झळकावला आणि संघाला १ गोलची आघाडी मिळवून दिली. मात्र त्यानंतर केलेल्या चुका अंगाशी आल्या. सामन्याच्या ३५ व्या मिनिटाला पोर्तुगालच्या रुबेन डायसने स्वगोल केल्याने जर्मनीला १-१ ने बरोबरी साधता आली.
🇵🇹🆚🇩🇪 = 🤯
⏰1⃣5⃣⚽️ Ronaldo
⏰3⃣5⃣⚽️ Rúben Dias og
⏰3⃣9⃣⚽️ Raphaël Guerreiro og
⏰5⃣1⃣⚽️ Havertz
⏰6⃣0⃣⚽️ Gosens
⏰6⃣7⃣⚽️ Diogo Jota #EURO2020 pic.twitter.com/S7BQFCqqjR— UEFA EURO 2020 (@EURO2020) June 19, 2021
ही चूक कमी होती की काय?
३९ व्या मिनिटाला राफेल गुरेरोने तोच कित्ता गिरवला आणि स्वगोल झाला. यामुळे जर्मनीला पहिल्या सत्रात १ गोलची आघाडी मिळाली. यानंतर पोर्तुगाल संघावर दडपण आलं आणि बरोबरी साधण्यासाठी धडपड सुरु झाली.