IPL 2021 आता अखेरच्या टप्प्यात, Play Offs मध्ये जाणार ‘या’ 4 टीम; Mumbai Indians चं भवितव्य धोक्यात?

चेन्नई सुपरकिंग्स (CSK) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या दोन टीम नक्कीच प्ले ऑफमध्ये प्रवेश करतील, असं आकाश चोप्रा म्हणाला आहे.

    IPL 2021 चं दुसरं सत्र आता अखेरच्या टप्प्यावर येऊन पोहचलं आहे. पण अजूनही कोणतीच टीम प्ले-ऑफमध्ये क्वालिफाय झालेली नाही. IPL Play Offs पोहोचण्याच्या अगदी जवळ पोहोचल्या आहेत, तर काहींमध्ये तगडी स्पर्धा सुरू आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने कोणत्या चार टीम प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवतील, याबाबतचं भाकीत वर्तवलं आहे.

    IPL Play Offs मध्ये जाणार 4 टीम

    चेन्नई सुपरकिंग्स (CSK) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या दोन टीम नक्कीच प्ले ऑफमध्ये प्रवेश करतील, असं आकाश चोप्रा म्हणाला आहे. तसंच विराट कोहलीची आरसीबी (RCB) प्ले-ऑफमध्ये पोहोचणारी तिसरी टीम असेल, असं त्याला वाटतं. परंतु मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएलच्या यंदाच्या मोसमात कोठेतरी दूर असल्यासारखं वाटत आहे.

    चौथ्या क्रमांकासाठी मुंबई आणि कोलकाता यांच्यात चुरस असेल, असं आकाश चोप्रा म्हणाला. यंदा मुंबईऐवजी कोलकाता प्ले-ऑफमध्ये क्वालिफाय होईल, असं दिसतंय कारण मुंबई नेहमीसारखी टीम दिसत नाही. त्यामुळे Mumbai Indians चं भवितव्य धोक्यात असल्यासारखं दिसत आहे.