FIFA विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सची डेन्मार्कवर २-१ ने मात

    कतार येथे सुरु असलेली फिफा विश्वचषक स्पर्धा आता अतिशय रोमांचक होऊ लागली आहे. काल फ्रान्स विरुद्ध डेन्मार्क यांच्यात फुटबॉलचा सामना पार पडला. यासामन्यात फ्रान्सनं डेन्मार्कचा २-१ ने पराभव केला. हा सामना स्टेडियम ९७४ वर खेळला गेला.

    सामन्यात फ्रान्सकडून केलियन एम्बापेनं पहिला गोल केला. त्यानंतर अँड्रेस क्रिस्टेनसेननं डेन्मार्कसाठी पहिला गोल केला. त्यानं ६८ व्या मिनिटाला हा गोल केला. अशाप्रकारे डेन्मार्कनं सामन्यात बरोबरी साधली. यानंतर पुन्हा एकदा फ्रान्ससाठी ८६ व्या मिनिटाला किलियन एम्बापेनं गोल केला. या गोलनंतर फ्रान्स संघाने सामन्यात २-१ अशी आघाडी घेतली. त्याचवेळी, याआधी हाफ टाईमपर्यंत दोन्ही संघ गोल करू शकले नाहीत.

    डेन्मार्कचा संघ:
    कॅस्पर श्मीचेल (कर्णधार, गोलकीपर), जोआकिम अँडरसन, अँड्रियास क्रिस्टेनसेन, व्हिक्टर नेल्सन, रॅस्मस क्रिस्टेनसेन, पियरे-एमिल होजब्जर्ग, ख्रिश्चन एरिक्सन, जोआकिम महले, जेस्पर लिंडस्ट्रॉम, अँड्रियास कॉर्नेलियस, मिकेल डॅम्सगार्ड

    फ्रान्सचा संघ:
    ह्यूगो लॉरिस (कर्णधार, गोलकीपर, ज्युल्स कोंडे, राफेल वराणे, डेओट उपमेकानो, थिओ हर्नांडेझ, ऑरेलियन चौमेनी, एड्रियन रॅबिओट, अँटोइन ग्रिजमन, ओस्माने डेम्बेले, ऑलिव्हियर गिरौड, किलियन एम्बापे.