Gautam Gambhir's initiative won the hearts of common people, you will get a meal for Rs. 1 in 'Jana Rasoi'

भाजप खासदार गौतम गंभीर यांनी पूर्व दिल्लीतील गांधी नगर येथे जन रसोईच्या पहिल्या कँटिनचे मोठ्या दिमाखात उद्घाटन केले आहे. या जन रसोई उपहारगृहाच्या माध्यमातून गरजूंना १ रुपयांत जेवणाची सोय केली जाणार आहे.

दिल्ली : भाजपा खासदार गैतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी कोरोना काळात अनेक कुटुंबीयांना मदतीचा हात दिला. सरकारला आपल्या खासदार फंडातील निधी कोरोनाविरोधात लढ्यासाठी दिली. तसेच त्यांच्या गौतम गंभीर फाऊंडेशनच्या माध्यमातूनही त्यांनी स्थलांतरित मजूरांना मदत केली होती. लॉकडाऊनमुळे तृतीय पंथीयांचेही प्रचंड हाल झाले होते. त्यांनाही गौतम गंभीरने मदत केली होती. ही मदतीची सेवी अखंडीत ठेवण्यासाठी आणखी एक उपक्रम हाती घेतला आहे. पूर्व दिल्लीच्या मतदार संघात १ रुपयांत जेवणाची सोय (Jana Rasoi) करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

भाजप खासदार गौतम गंभीर यांनी पूर्व दिल्लीतील गांधी नगर येथे जन रसोईच्या पहिल्या कँटिनचे मोठ्या दिमाखात उद्घाटन केले आहे. या जन रसोई उपहारगृहाच्या माध्यमातून गरजूंना १ रुपयांत जेवणाची सोय केली जाणार आहे. यावेळे असे सांगण्यात आले आहे की, कोणत्याही जाती, धर्म आणि पंथाच्या व्यक्तिला निरोगी आणि आरोग्यदायी जेवण मिळायलाच हवं, तो प्रत्येकाचा हक्कच आहे, असे मला वाटते. बेघर आणि निराधार लोकांना दोन वेळचं जेवणही मिळत नसल्याचे पाहून वाईट वाटते,असे गौतम गंभीर यांनी म्हटले आहे.
कँटिनची क्षमता १०० माणसांची आहे, परंतु कोरोना नियमांमुळे एका वेळी ५० लोकांनाच येथे येता येणार आहे. जेवणात भात, मसूरची डाळ आणि भाजी असा आहार असणार आहे.

गौतम गंभीर स्वतःच्या खिशातून आणि गौतम गंभीर फाऊंडेशनच्या माध्यमातून हा खर्च उचलणार आहे. तसेच या उपक्रमात सरकारची मदत घेणार नसल्याचेही गौतम गंभीरच्या कार्यालयातून म्हटले आहे.