गौतम गंबीरचे आयपीएल बद्दल धक्कादायक विधान; म्हणाला “खेळाडूंना दोष द्या, त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना जबाबदार धरा”

    भारताचे माजी क्रिकेटपटू आणि भाजप पक्षाचे विद्यमान खासदार गौतम गंभीर (Gautam Gambhir) आपल्या विधानामुळे नेहमीच चर्चेत राहता. अनेकदा कार्यक्रमात अथवा समालोचन करीत असताना ते एखाद्या विषयाची स्पष्ट मते मांडतात. मात्र अनेकदा त्यांच्या वक्तव्यामुळे वाद देखील निर्माण होतो. गौतम गंभीरने नुकतेच आयपीएल बाबत देखील एक धक्कादायक विधान केले आहे.

    गौतम गंभीर हा टी-२० विश्वचषक 2007 आणि एकदिवसीय विश्वचषक 2011 जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य होता. तसेच गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने दोनदा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर असे मानतो की, गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेटमध्ये घडलेली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आयपीएलची (IPL) ओळख.

    गौतम गंभीर म्हणाला, ‘मला असे म्हणायचे आहे की आयपीएल ही भारतीय क्रिकेटमध्ये घडलेली सर्वोत्कृष्ट गोष्ट आहे, परंतु प्रत्येक वेळी जेव्हा भारतीय खेळाडू क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत नाहीत तेव्हा सर्व जबाबदारी आयपीएलवर येते जी योग्य नाही. जर आम्ही आयसीसी स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली नाही, तर खेळाडूंना दोष द्या, त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना जबाबदार धरा, परंतु आयपीएलकडे बोट दाखवू नका.

    पुढे गौतम गंभीर म्हणाला, “आयपीएलमध्ये आल्याने खेळाडूंना आर्थिक सुरक्षिततेची जाणीव झाली आहे. एक खेळाडू वयाच्या 35-36 पर्यंत कमवू शकतो. आयपीएल त्याला आर्थिक सुरक्षा प्रदान करते जे महत्त्वाचे आहे. जे तळागाळातील अधिक खेळाडूंच्या विकासासाठी मदत करत आहे.’ आयपीएल मध्ये भारतीय प्रशिक्षक घेण्याबाबत गंभीर म्हणाला, ‘मी लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटर आहे. मला एक गोष्ट बदलायची आहे की मला सर्व भारतीय प्रशिक्षकांना आयपीएलमध्ये पाहायचे आहे. कारण बिग बॅश किंवा इतर कोणत्याही परदेशी लीगमध्ये कोणत्याही भारतीय प्रशिक्षकाला संधी मिळत नाही. भारत क्रिकेटमध्ये महासत्ता आहे, पण आमच्या प्रशिक्षकांना कुठेही संधी मिळत नाही. सर्व परदेशी येथे येतात.