गोल मशीन रोनाल्डोचा निवृत्तीबाबत मोठा खुलासा

    फुटबॉल (Football) विश्वात गोल मशीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) याने आपल्या निवृत्ती संदर्भात भाष्य केले आहे. यावेळी त्याने फुटबॉल चाहत्यांना आनंदाची बातमी देत पुढील दोन वर्ष निवृत्ती घेण्याचा कोणताही प्लॅन नसल्याचे म्हटले आहे. रोनाल्डोने केलेल्या खुलाशानंतर फुटबॉल चाहते आनंदी झाले आहेत.

    फुटबॉल फेडरेशन ऑफ पोर्तुगालने (FPF) लिस्बन येथे आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यात रोनाल्डोला पोर्तुगाल देशासाठी सर्वाधिक गोल केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. या दरम्यान तो म्हणाला, ‘माझा प्रवास अजून संपलेला नाही. मला विश्वचषक आणि युरोचा भाग व्हायचे आहे. मी यासाठी खूप उत्सुक आहे आणि माझे ध्येय अगदी स्पष्ट आहे.” रोनाल्डोला आता युरो २०२४ पर्यंत फुटबॉल खेळायचे अशे असे त्याने म्हंटले.

    रोनाल्डोची यशस्वी कारकिर्द :
    रोनाल्डोने आपल्या कारकिर्दीत पोर्तुगालसाठी १८९ सामन्यांत ११७ गोल केले आहेत. तर, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याचा विक्रम रोनाल्डोच्या नावावर होता. यावेळी रोनाल्डोने आयर्लंडविरुद्ध गोल करत इराणचा फुटबॉलपटू अली दाईच्या १०९ गोलचा विक्रम मागे टाकला. रोनाल्डो आता कतारमध्ये नोव्हेंबरमध्ये सुरू होणाऱ्या विश्वचषक २०२२ मध्ये आपल्या देशाकडून खेळताना दिसणार आहे. ही त्याची 10वी मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा असणार आहे.