गोल्फर दिक्षा डागरने रचला इतिहास, दोन वेळेस पदक जिंकणारी ती बनली पहिली गोल्फर

दिक्षाने याआधी देखील 2017 साली भारतासाठी या ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते.

    Diksha Dagar Gold in Deaflympics 2021 : ब्राझीलच्या कॅसियस दो सूल या शहरात सुरु असलेल्या 24 व्या मूकबधीर ऑलिम्पिक (Deaflympics) स्पर्धेत भारताने दमदार कामगिरी सुरुच ठेवली आहे. दिक्षा डागरने अंतिम फेरीत अमेरिकेच्या ऍशलिन ग्रेसचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले आहे. भारताने आणखी एका सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. विशेष म्हणजे दिक्षाने याआधी टर्की इथे झालेल्या 2017 सालच्या मूकबधीर ऑलिम्पिकमध्ये देखील रौप्यपदक मिळवल्याने दोन वेळा ऑलिम्पिक पदक मिळवणारी ती पहिली गोल्फर ठरली आहे.

    दीक्षाची ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी

    दीक्षाने गोल्फ खेळात आजवर उत्तम कामगिरी केली आहे. 21 वर्षीय डावखुऱ्या दिक्षाने अनेक आंतरराष्ट्रीय गोल्फ स्पर्धांमध्ये महिला गटात अप्रतिम कामगिरी केली आहे. अनेत युरोपियन देशात तिने विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे 2021 मध्ये, दिक्षा टोकियो ऑलिम्पिकसाठी शेवटच्या क्षणी पात्र ठरली आणि डेफलिम्पिक आणि ऑलिम्पिक या दोन्ही खेळांमध्ये खेळणारी पहिली गोल्फर बनली आहे.

    मूकबधीर ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले

    भारताने याच मूकबधीर ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटन खेळात देखील सुवर्णपदक मिळवलं. तसेच धनुष श्रीकांतने 10 मीटर एअर रायफल शूटींग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले असून शौर्य सैनीने कांस्य पदकावर नाव कोरले आहे. दीक्षाने ही सुवर्णकामगिरी करण्याआधीही भारतीय खेळाडूनी या स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. भारतीय संघाने जपानच्या खेळाडूंना फायनलमध्ये 3-1 ने मात देत हे सुवर्णपदक मिळवलं.