
पुणे : वर्ल्ड कप 2023 चे येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान, वर्ल्ड कप चषक देशातील प्रत्येक राज्यात फिरत आहे. प्रत्येक राज्यातील क्रिकेट असोसिएशनकडून याचे स्वागत करण्यात येत आहे. दरम्यान, आज वर्ल्ड कप चषकाचे पुण्यात आगमन झाले आहे. यावरच आज महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी वर्ल्ड कप ट्रॉफीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हजारो क्रीडाप्रेमींच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक
त्यानंतर आता या ट्रॉफीची भव्य मिरवणूक एमएमसीसी, फर्ग्युसन कॉलेज रोड मार्गे कृषी महाविद्यालयापर्यंत जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ही ट्रॉफी सामान्य नागरिकांना पाहता यावी यासाठी ही ट्रॉफी सिम्बायोसिस, एफसी कॉलेज, एमएमसीसी कॉलेजमध्ये जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर ही ट्रॉफी कृषी महाविद्यालयात सामान्य नागरिकांना पाहता यावी यासाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती एससीएचे अध्यक्ष रोहित पवार यांनी दिली.
सामान्य नागरिकांसाठी ट्रॉफी कृषी महाविद्यालयात
प्रत्येक राज्याने आपआपल्या स्टाईलने ट्रॉफीचे स्वागत केले. महाराष्ट्राची जनतेला ही ट्रॉफी कशी दिसते याकरिता ही ट्रॉफी सामान्य नागरिकांना दिसावी याकरिता पुण्याच्या कृषी महाविद्यालयात ठेवण्यात येणार आहे. यावेळी नागरिकांना ट्रॉफीसोबत फोटो काढता येणार आहेत.
जेडब्ल्यू मेरियट हॉटेलपासून मिरवणुकीची सुरुवात
सर्व खेळाडूंना आम्ही ही ट्रॉफी दाखवली आहे. परंतु, वर्ल्ड कप ट्रॉफी बघण्याची संधी कोणाला मिळत नाही. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशने असा निर्णय घेतला की, सर्वसामान्य नागरिकांना ही ट्रॉफी पाहता यावी यासाठी या ट्रॉफीची रॅलीची सुरुवात जेडब्ल्यू मेरिएट हॉटेलपासून या रॅलीची सुरुवात होणार आहे. ही मिरवणूक येथून सुरू झाल्यानंतर दिग्गज खेळाडू, असोसिएशनचे मेंम्बर आमच्यासोबत असणार आहेत. ही मिरवणूक प्रथम सिम्बायोसिसमध्ये जाणार असल्याची माहिती रोहित पवारांनी दिली.
सिम्बायोसिमधील विद्यार्थ्यांकडून ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
सिम्बायोसिस कॉलेजमधील विद्यार्थी यावेळी मोठ्या जल्लोषात स्वागत करणार आहेत. ही मिरवणूक प्रथम सिम्बायोसिसमध्ये जाणार आहे. तेथे काही वेळ मिरवणूक थांबणार आहे. त्यानंतर सिम्बायोसिसचे विद्यार्थी यावेळी कार्यक्रम करणार आहेत. मोठ्या जल्लोषात वर्ल्ड कप चषकाचे स्वागत करण्यात आले.
त्यानंतर ही मिरवणूक बीएमसीसी कॉलेज या वर्ल्ड कपचे जोरदार स्वागतासाठी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. एफसी रोडवरसुद्धा क्रिकेटप्रेमींची गर्दी स्वागतासाठी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. ही मिरवणूक नंतर एफसी कॉलेजमध्ये जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सामान्य नागरिकांसाठी ट्रॉफी पुणे कृषी विद्यालयात
त्यानंतर पुण्यातील अॅग्री कल्चरल कॉलेजला ही भव्य मिरवणूक जाणार आहे. ही ट्रॉफी सामान्या नागरिकांची आहे. प्रत्येक क्रीडाप्रेमींची ही ट्रॉफी आहे, त्यामुळे ही ट्रॉफी सामान्य नागरिकांना पाहता यावी यासाठी ठेवण्यात येणार आहे.प्रत्येक क्रिकेटप्रेमींसाठी ही ट्रॉफी तेथे ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ढोल-ताशांच्या गजरात ही मिरवणूक जाणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.