इंग्लंड संघाचा इराणवर मोठा विजय

विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने १६ व्या वेळेस स्पर्धेत सहभाग मिळवला आहे. तर इराणचा संघ सहाव्यांदा स्पर्धेत सहभागी होत आहे. विशेष म्हणजे हे दोघेही पहिल्यांदाच मैदानात एकमेंकाविरुद्ध आमने-सामने आले होते. इंग्लंड संघाने ६-२ अशा मोठ्या फरकाने इराणवर मात करत ग्रुप ब मध्ये पहिला विजय पटकावून अव्वल स्थान मिळवलं आहे

    कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत सोमवारी इंग्लंड विरुद्ध इराण (England vs Iran) यांच्यात झालेल्या सामन्यात इंग्लंड संघाने विजय मिळवला. इंग्लंड संघ सुरुवातीपासूनच चांगल्या फॉर्मात असल्याने सामन्यात इंग्लंड संघाचे पारडे जड होते. प्रत्यक्ष सामन्यातही इंग्लंडने दमदार खेळाचे प्रदर्शन करत ६-२ अशा मोठ्या फरकाने इराणवर मात केली.

    विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने १६ व्या वेळेस स्पर्धेत सहभाग मिळवला आहे. तर इराणचा संघ सहाव्यांदा स्पर्धेत सहभागी होत आहे. विशेष म्हणजे हे दोघेही पहिल्यांदाच मैदानात एकमेंकाविरुद्ध आमने-सामने आले होते. दरम्यान सामना इंग्लंडने जिंकल्याने हेड टू हेड रेकॉर्डमध्ये इंग्लंड १-० ने आघाडीवर पोहोचला आहे. सामन्यात ३५ व्या मिनिटाला जुड बेलिंगहमने गोल करत संघाचं खातं उघडलं. त्यानंतर ४३ व्या मिनिटाला साकाने गोल केला तर रहीम स्टर्लिंगने हाल्फ टाईमनंतर मिळालेल्या एक्स्ट्रा वेळेत गोल केल्यामुळे हाल्फ टाईमपूर्वी ३-० ची मोठी आघाडी घेतली.

    हाल्फ टाईमनंतर ६५ व्या मिनिटाला इराणच्या मेहदी तरेमीने गोल केला. पण इराण आघाडी वाढवण्याचा प्रयत्न करणार तोवरच ७१ स्टार खेळाडू मार्कस रॅशफोर्डने गोल करत इंग्लंडची आघाडी वाढवली. ८९ व्या मिनिटाला जॅक ग्रेयलिशने आणखी एक गोल करत इंग्लंडने आघाडी घेत तब्बल ६ गोल केले. ज्यानंतर एक्स्ट्रा टाईममध्ये इराणकडून मेहदी तरेमीने पेनल्टीवर गोल केल्यामुळे इराणने ६-२ अशा फरकाने सामना गमावला. या विजयासह इंग्लंड संघाने ग्रुप ब मध्ये पहिला विजय मिळवत अव्वल स्थान मिळवलं आहे