SRH vs GT  हैदराबादच्या शिस्तबद्ध बॉलिंग अटॅकपुढे आज लागणार गुजरातची कसोटी

आयपीएल २०२२ आता त्याच्या उत्तरार्धात आला आहे.आज होणारी ४० वी मॅच सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स अशी आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर ही लढत होतीय. या सिझनमध्ये या दोन्ही टीम सध्या फॉर्मात आहेत. गुजरात टायटन्सनं आत्तापर्यंत फक्त १ मॅच गमावली आहे.

    मुंबई : आयपीएल २०२२ आता त्याच्या उत्तरार्धात आला आहे.आज होणारी ४० वी मॅच सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स अशी आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर ही लढत होतीय. या सिझनमध्ये या दोन्ही टीम सध्या फॉर्मात आहेत. गुजरात टायटन्सनं आत्तापर्यंत फक्त १ मॅच गमावली आहे. तर केन विल्ययमसनच्या सनरायझर्स हैदराबादनं पहिल्या २ मॅच गमावल्यानंतर सलग ५ मॅच जिंकत टॉप ४ मध्ये जागा मिळवली आहे.त्यामुळे आजच्या मॅच मध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.

    पॉईंट टेबलमध्ये हैदराबादची टीम सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर गुजरातनं ७ पैकी ६ सामने जिंकले असून १२ पॉईंट्ससह गुजरातची टीम दुसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरातनं आत्तापर्यंत फक्त हैदराबाद विरूद्ध एकमेव लढत गमावली आहे. या पराभवाचा बदला घेण्याची संधी त्यांना आहे.

    गुजरातचा कॅप्टन हार्दिक पांड्या चांगलाच फॉर्मात आहे. हार्दिकनं कोलकाता विरूद्ध तिसऱ्या क्रमांकावर येत अर्धशतक झळकावलं होतं तसेच दोन अर्धशतकानंतर गिलची बॅट शांत आहे. हैदराबादच्या शिस्तबद्ध बॉलिंग अटॅकपुढे त्याची कसोटी लागेल.

    दुसरिकडं हैदराबादनं दमदार बॉलिंगच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला फक्त ६८ रनवर ऑल आऊट केलं. त्यानंतर फक्त ८ ओव्हरमध्ये मॅच जिंकली. या मोठ्या विजयानंतर त्यांचा आत्मविश्वास चांगलाच उंचावलाय. हैदराबादचे सर्वच बॉलर सध्या फॉर्मात आहेत. त्यांना राहुल त्रिपाठी आणि अभिषेक शर्माची चांगली साथ मिळतीय.

    सनरायझर्स हैदराबादची संभाव्य खेळाडू : अभिषेक शर्मा, केन विलियमसन, राहुल त्रिपाठी, एडन मार्करम, निकोलस पूरन, शशांक सिंह, जगदीश सुचित, भुवनेश्वर कुमार, मार्क यानसेन, टी नटराजन आणि उमरान मलिक

    गुजरात टायटन्सची संभाव्य खेळाडू : ऋद्धिमान साहा, शुभमन गिल, हार्दिक पंड्या, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अभिनव मनोहर, लॉकी फर्ग्युसन, अल्जारी जोसेफ, यश दयाल आणि मोहम्मद शमी.