IPL 2024

  IPL 2024 15 Day Schedule : येत्या काही दिवसांमध्ये IPL 2024 इंडियन प्रीमियर लीग 2024 ची सुरुवात ही 22 मार्चपासून सुरू होणार आहे. याबाबतची घोषणा नुकतीच आयपीएल चेअरमन अरुण सिंह धुमल यांनी केली आहे. आज आयपीएलचे वेळापत्रक जाहीर होणार आहे. मात्र, हे वेळापत्रक फक्त 15 दिवसांचेच असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतरच

  आयपीएल चेअरमन धुमल यांनी लोकसभेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतरच आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर होणार असल्याचे सांगितले होते. यंदाच्या 17 व्या हंगामाचा पहिला सामना हा चेन्नईत खेळला जाण्याची शक्यता आहे.

  एक खास ग्रँड ओपनिंग सेरेमनी आयोजित

  आयपीएलच्या 2024 च्या हंगामाचे वैशिष्ट्य म्हणजे लीग सुरू होण्यापूर्वी एक खास ग्रँड ओपनिंग सेरेमनी आयोजित केला जाणार आहे. मात्र, पहिला सामना हा गेल्या हंगामातील फायनलिस्ट चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्याने होणार की नाही हे अजून निश्चित नाही.

  आयपीएलचेदेखील सामने होणार

  यावर्षी एप्रिल – मे महिन्यात भारतात लोकसभा निवडणूक होत आहे. या दरम्यानच आयपीएलचेदेखील सामने होणार असून दोन्हीचे शेड्यूल हे क्लॅश होण्याची शक्यता आहे. निवडणूक आणि आयपीएल या दोन्हीला एकाचवेळी सुरक्षा देणे शक्य होत नाही.

  त्यामुळे बीसीसीआय निवडणूक आयोग लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याची वाट पाहत आहे. त्यानंतरच आयपीएलचे पूर्ण शेड्यूलदेखील जाहीर करण्यात येईल.