बालपण  घालवले गरीबीत, कसोटी पदार्पणात झळकावले शतक, ५ आयपीएल जिंकणारा एकमेव कर्णधार

टीम इंडियाचा कर्णधार आणि स्टार सलामीवीर रोहित शर्मा आज त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे.

    मुंबई: टीम इंडियाचा कर्णधार आणि स्टार सलामीवीर रोहित शर्मा आज त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. रोहितचा जन्म 30 एप्रिल 1987 ला नागपूर, महाराष्ट्र येथे झाला. ‘हिटमॅन’ रोहित हा जगातील एकमेव फलंदाज आहे ज्याने वनडेमध्ये 3 द्विशतके झळकावली आहेत. यासोबतच वनडे क्रिकेटमध्ये सर्वात मोठी इनिंग खेळण्याचा विक्रमही रोहितच्या नावावर आहे. जाणून घेऊया रोहितशी संबंधित काही खास गोष्टी आणि रेकॉर्ड.

    गरिबीत बालपण

    रोहितचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. त्यांचे वडील गुरुनाथ शर्मा हे ट्रॅव्हल कंपनीचे काम पाहत असत. रोहितच्या वडिलांचे उत्पन्न जास्त नव्हते, त्यामुळे त्याचे पालनपोषण बोरिवलीत आजोबा आणि काकांनी केले. रोहितने 1999 मध्ये त्याच्या मामाच्या कमाईतून क्रिकेट कॅम्पमध्ये क्रिकेट खेळायला सुरुवात केली. हिटमॅनला त्याच्या काकांनी पहिली क्रिकेट बॅट दिली होती.

    त्यावेळी रोहितचे प्रशिक्षक दिनेश लाड होते आणि त्यांनी तुझी शाळा बदलून स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये जा, असे सांगितले होते, कारण लाड तेथे प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. रोहितला क्रिकेट खेळण्याची अधिक सुविधा मिळावी म्हणून त्याने असे सांगितले.

    ऑफ स्पिन सुरू केले
    रोहितने आपल्या कारकिर्दीची सुरुवात ऑफ-स्पिनर म्हणून केली पण नंतर प्रशिक्षक दिनेश लाड यांच्या सल्ल्यानुसार त्याने फलंदाजी स्वीकारली. त्यानंतर रोहित 8व्या क्रमांकावर फलंदाजी करायचा आणि नंतर लाडने त्याला सलामीला पाठवायला सुरुवात केली. सलामीवीर म्हणून रोहितने या सामन्यात आधीच शतक झळकावले होते. त्यानंतर रोहितने क्रिकेटमध्ये अनेक टप्पे गाठले आहेत. रोहितने 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले अर्धशतक केले होते.

    2007 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण

    2007 च्या आयर्लंड दौऱ्यावर, रोहित शर्माला टीम इंडियासाठी पहिला एकदिवसीय सामना खेळण्याची संधी मिळाली. मात्र, त्या सामन्यात त्याची फलंदाजी येऊ शकली नाही. यानंतर 2007 मध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 विश्वचषकाच्या संघातही रोहितची निवड झाली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात हिटमॅनला T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि त्याने 40 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या. भारताने हा सामना 37 धावांनी जिंकला आणि रोहित ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला.पाकिस्तानविरुद्धच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याने शानदार फलंदाजी करताना 16 चेंडूत 30 धावांची नाबाद खेळी खेळली.

    2013 मध्ये कसोटी पदार्पण

    ODI आणि T20 क्रिकेटमध्ये ठसा उमटवल्यानंतर पूर्ण 6 वर्षांनी हिटमॅनला कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली. रोहितने 9 नोव्हेंबर 2013 ला कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्या सामन्यात रोहितने 177 धावांची खेळी खेळली होती. त्याच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही त्याने विंडीजविरुद्ध शतक झळकावले.

    कर्णधार म्हणून रोहितचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे

    कर्णधार म्हणून रोहितचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. त्याने 43 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले असून 37 सामने जिंकले आहेत. भारताला 2014 मध्येच पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याच वेळी, आयपीएलमध्ये त्याने आपल्या संघासाठी 56.20 टक्के सामने जिंकले आहेत. पाच आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम करणारा तो एकमेव कर्णधार आहे.

    पूर्णवेळ भारतीय कर्णधार झाल्यापासून रोहितने एकही सामना गमावलेला नाही. त्याने सलग 14 सामने जिंकले आहेत. यंदा ऑस्ट्रेलियन मैदानावर टी-२० विश्वचषक खेळवला जाणार असून टीम इंडियाला हिटमॅनकडून विजेतेपदाच्या मोठ्या आशा आहेत.