…तर लॉकडाऊन कराच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधानावर हरभजन सिंगची रोखठोक भूमिका

लोक जर सांगूनही ऐकत नसतील तर लॉकडाऊन कराच. लोक हा मुद्दा केव्हा गांभीर्यानं समजून घेणार आहेत आणि कसा तेच कळत नाही, असा संताप हरभजननं ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

    राज्यात दिवसागणिक कोरोनाची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला लॉकडाऊनबाबत संकेत दिले आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधानावर हरभजन सिंगनी रोखठोक भूमिका मांडली आहे.

    लोक जर सांगूनही ऐकत नसतील तर लॉकडाऊन कराच. लोक हा मुद्दा केव्हा गांभीर्यानं समजून घेणार आहेत आणि कसा तेच कळत नाही, असा संताप हरभजननं ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

    नागरिक नियमांचं काटेकोरपणे पालन करत नसल्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. हे जर असंच सुरू झालं तर लॉकडाऊनचा विचार करावा लागेल, असं विधान मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलं होतं. या ट्विटला रिप्लाय देत हरभजन सिंगनं कोरोना प्रतिबंधक नियमांना गांभीर्यानं न घेणाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे.