तिसऱ्या पराभवानंतर हार्दिक पांड्या इमोशनल, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

वानखेडे स्टेडियमवर सामना सुरू होण्यापूर्वी हार्दिक नाणेफेकीसाठी बाहेर आला तेव्हा प्रेक्षकांनी पांड्याला शिव्या देत ट्रोल केले.

    हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला आयपीएल 2024 मधील तिसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा 6 गडी राखून पराभव केल्याने मुंबईला विजयाचे खातेही उघडता आले नाही. या पराभवामुळे मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला प्रचंड ट्रोल करण्यात आले. वानखेडे स्टेडियमवर सामना सुरू होण्यापूर्वी हार्दिक नाणेफेकीसाठी बाहेर आला तेव्हा प्रेक्षकांनी पांड्याला शिव्या देत ट्रोल केले. आता राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या दारूण पराभवानंतर कर्णधार हार्दिकने त्याच्या इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

    हार्दिक पांड्याची पोस्ट
    मुंबई इंडियन्सला त्यांच्या घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सविरुद्ध 6 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवानंतर मुंबई संघाचा कर्णधार हार्दिकने आपल्या माजी खेळाडूवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने लिहिले की, जर तुम्हाला या संघाबद्दल एक गोष्ट जाणून घ्यायची असेल तर ती म्हणजे आम्ही कधीही हार मानणार नाही. आम्ही लढत राहू आणि लढत राहू.

    नवीन कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची आयपीएल 2024 मध्ये अत्यंत खराब सुरुवात झाली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने या मोसमात पहिले तीन सामने गमावले. आपल्या नेतृत्वाखाली पांड्याने 2022 मध्ये गुजरात टायटन्ससाठी IPL चे विजेतेपद पटकावले होते आणि 2023 मध्ये गुजरात संघाला अंतिम फेरीत पोहोचवले होते. मात्र, मुंबईत परतताना त्याची सुरुवात खराब झाली. अहमदाबाद आणि हैदराबादनंतर मुंबईतही हार्दिकला चाहत्यांकडून नाराजीचा सामना करावा लागला.