Who will play cricket without money? Hardik Panda's cash-strapped role

स्कॉटलंड आणि नामिबियाच्या मॅचच्या दरम्यान स्टार स्पोर्ट्सवर टीम इंडियाच्या प्रॅक्टिस सेशन्सची काही दृश्ये दाखवण्यात आली होती. त्यात हार्दिक पांड्या बॉलिंगची प्रॅक्टिस करताना दिसला. पांड्याने नेटमध्ये सुमारे २० मिनिटे शआर्दुल ठाकूर आणि भुवनेश्वर कुमारला बॉलिंग केली. बॉलिंग प्रॅक्टिसनतंर बंटिंग कोच विक्रम राठोड यांच्यासोबतही त्याने प्रॅक्टिस केली.

    दुबई : न्यूझीलंडविरुद्ध ३१ ऑक्टोबरला मैदानात उतरणाऱ्या टीम इंडियाकडून एक चांगली बातमी आली आहे. बराच काळापासून बॉलिंगपासून दूर असलेल्या हार्दिक पांड्याने बॉलिंगची प्रॅक्टिस सुरु केली आहे. हार्दिकच्या फिटनेसबाबत नेक प्रश्न सातत्याने उपस्थित करण्यात येत होते. आता त्याच्या बॉलिंग प्रॅक्टिसच्या बातमीने त्याच्या चाहत्यांचा जीव नक्कीच भांड्यात पडला असेल.

    २० मिनिटे केली बॉलिंगची प्रॅक्टिस
    स्कॉटलंड आणि नामिबियाच्या मॅचच्या दरम्यान स्टार स्पोर्ट्सवर टीम इंडियाच्या प्रॅक्टिस सेशन्सची काही दृश्ये दाखवण्यात आली होती. त्यात हार्दिक पांड्या बॉलिंगची प्रॅक्टिस करताना दिसला. पांड्याने नेटमध्ये सुमारे २० मिनिटे शआर्दुल ठाकूर आणि भुवनेश्वर कुमारला बॉलिंग केली. बॉलिंग प्रॅक्टिसनतंर बंटिंग कोच विक्रम राठोड यांच्यासोबतही त्याने प्रॅक्टिस केली.
    कमरेच्या झालेल्या ऑपरेशननंतर हार्दिकने बॉलिंग केलेली नाही. आयपीएल फेज २ मध्येही हार्दिक कुठल्याही मॅचमध्ये बॉलिंग करताना दिसला नाही. यापूर्वीच्या श्रीलंका सीरिजमध्येही बॉलिंग करतावता तो फार कमी वेळा दिसला.

    न्यूझीलंडच्या मॅचमध्ये संधी
    पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये हार्दीकने बॉलिंग केली नाही, यावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचमध्ये हार्दिकला ब्रेक दून शार्दुल ठाकूरला संधी द्यायला हवी, असे अनेक जाणकारांचे मत आहे. मात्र मॅचपूर्वी हार्दिक बॉलिंग प्रॅक्टिस करताना दिसणे, हे टीम इंडियासाठी चांगले संकेत मानायला हवेत. त्याची बॉलिंग प्रॅक्टिस त्याने फिटनेस टेस्ट पार केल्याचे चिन्ह मानावे लागेल.

    २४ ऑक्टोबरच्या पाकिस्तानविरद्धच्या मॅचमध्ये हार्दिकच्या खांद्यालाही दुखापत झाली होती. त्याच्याजागी ईशान किशनने फिल्डिंग केल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या दुखापतीचे स्कॅनिंगही करण्यात आले होते.