harish bharla won bronze medal in taulu kwanshu category maharashtra state mini olympic competition

    पालघर : क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशन (All Maharashtra Wushu Association) यांच्या सहकार्याने ०८ जानेवारी ते १२ जानेवारी रोजी शिवछत्रपती क्रीडा संकुलन, बालेवाडी(पुणे) येथे महाराष्ट्र राज्य मिनी ऑलम्पिक स्पर्धा (Maharashtra State Mini Olympic Competition) आयोजित करण्यात आली होती.

    या स्पर्धेसाठी वुशू खेळात पालघर जिल्ह्यातून (Palghar District) हरीश भरला (Harish Bharla), झील माणिक, पुजा शहा यांची यांची निवड झाली होती. या स्पर्धेत हरीश भरला याने पालघर वुशू असोसिएशनचे सचिव व प्रशिक्षक राम कोटप (Ram Kotap) यांच्या मार्गदर्शनाखाली ताउलू क्वांशू प्रकारात (Taulu Kwanshu) कांस्य पदक (Bronze medal) पटकावले. हरीशवर संपूर्ण जिल्ह्यातून उल्लेखनीय कामगिरीबद्दल कौतुकाचा वर्षाव होत आहे.