Harmanpreet Singh and Lovelina Asian Games 2023

  Asian Games 2023 : चीनमधील हांगझाओ येथ 23 सप्टेंबरपासून एशियन गेम्सला सुरुवात होणार आहे. या दिवशी एशियन गेम्सचा उद्घाटन सोहळा होणार असून यासाठी भारतीय खेळाडूंच्या समूहाचे नेतृत्व हे भारतीय पुरूष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि महिला बॉक्सर लवलिना बोरगोहेन करणार आहेत. या दोघांना एशियन गेम्समध्ये भारताचे ध्वजधारक होण्याचा मान मिळणार आहे.
  एशियन गेम्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेतृत्व हे करणार
  आज (दि. 20) इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने एशियन गेम्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेतृत्व हे हमरमनप्रीत सिंग आणि लवलिना बोरगोहेन संयुक्तरित्या करतील असा निर्णय घेतला. एशियन गेम्समध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या समुहात एकूण 655 खेळाडूंचा समवेश आहे. हा आतापर्यंतचा भारताचा एशियन गेम्समधील सर्वात मोठा चमू आहे.
  आम्ही आज हा निर्णय ठरवून घेतला
  आज पीटीआयशी बोलताना सांगितले की, आम्ही आज हा निर्णय ठरवून घेतला आहे. यावेळी भारतीय खेळाडूंच्या चमूचे दोन ध्वजधारक असतील. पुरूष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि बॉक्सर लवलिना बोरगोहेन हे दोघे ध्वजधारक असतील.’
  भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा ध्वजधारक
  जकार्ता एशियन गेम्स 2018 च्या उद्घाटन सोहळ्यात भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राला ध्वजधारक होण्याचा मान मिळाला होता. यंदा लवलिना आणि हरमनप्रीत सिंग यांना हा मान मिळणार आहे. लवलिनाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 69 वजनी गटात कांस्य पदक पटकावले होते. ती यावर्षी 75 किलो वजनी गटात आपली दावेदारी सादर करणार आहे.
  भारताचा एक अव्वल दर्जाचा हॉकीपटू
  हरमनप्रीत सिंग हा देखील भारताचा एक अव्वल दर्जाचा हॉकीपटू आहे. तो टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कांस्य पदक जिंकणाऱ्या पुरूष हॉकी संघाचा सदस्य होता. हॉकी संघाने जवळपास 4 दशकांचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवला होता. यंदाच्या हांगझाओ एशियन गेम्समध्ये हॉकी संघ सुवर्ण पदक पटकावण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावणार आहे.