भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात कशी असेल प्लेईंग इलेव्हन, विराटच्या निर्णयामुळे कोणाचा होणार फायदा

  IND vs AFG 1st T20 : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेची सुरुवात उद्या ( दि. 11) मोहालीतून होत आहे. पहिल्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषेदत प्रशिक्षक राहुल द्रविडने विराट कोहली पहिल्या सामन्याला मुकणार असे सांगितले. त्यामुळे आता जवळपास 14 महिन्यानंतर टी 20 क्रिकेटमध्ये परतणाऱ्या रोहित शर्मासमोर संघ निवडीचे मोठे आव्हान असणार आहे.
  रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल सलामीला
  विराट कोहली वैयक्तिक कारणामुळे पहिला सामना खेळणार नाही. त्यामुळे टॉप ऑर्डरमध्ये कोणाला संधी द्यायची हा प्रश्न रोहितसमोर आहे. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल हे सलामीला येणार आहेत. यावर खुद्द राहुल द्रविडने पत्रकार परिषदेत शिक्कामोर्तब केले.
  सूर्यकुमारच्या अनुपस्थितीत चौथ्या क्रमांकावर कोण
  विराट कोहली पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याने तिसऱ्या क्रमांकावर कोण, याबाबत रोहितला विचार करावा लागणार आहे. या जागेसाठी तिलक वर्मा आणि शुभमन गिल ही दोन नावे चर्चेत आहेत. याचबरोबर शुभमन गिलला तिसऱ्या आणि तिलक वर्माला चौथ्या क्रमांकावरदेखील खेळवले जाऊ शकते. कारण सूर्यकुमारच्या अनुपस्थितीत चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार, हेदेखील ठरवावे लागणार आहे.
  रोहितची डोकेदुखी इथंच थांबत नाही. त्याला विकेटकिपर म्हणून जितेश शर्मा किंवा संजू सॅमसन यांच्यापैकी कोणाला खेळवायचे हेदेखील निश्चित करायचे आहे. सहाव्या स्थानावर रिंकू सिंह फिनिशर म्हणून जवळपास निश्चित झाला आहे. सातव्या क्रमांकावर अक्षर पटेल फलंदाजीला येईल. त्यानंतर कुलदीप यादवला रवी बिश्नोईऐवजी संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच, वेगवान गोलंदाज म्हणून अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मुकेश कुमार यांची वर्णी लागू शकते.
  भारताची संभाव्य प्लेईंग 11 :
  रोहित शर्मा (कर्णधार)
  यशस्वी जयस्वाल
  शुभमन गिल
  तिलक वर्मा
  संजू सॅमसन / जितेश शर्मा
  रिंकू सिंह
  अक्षर पटेल
  कुलदीप यादव
  अर्शदीप सिंग
  आवेश खान
  मुकेश कुमार