सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का, कोरोनाच्या विळख्यात सापडला हैदराबादचा खेळाडू ; आजचा सामना तळ्यात-मळ्यात?

सामन्याआधीच हैदराबाद संघाला मोठा धक्का बसला आहे. कोरोनाच्या विळख्यात (Covid -19) हैदराबाद संघाचा एक खेळाडू सापडला आहे.

    आयपीएल २०२१(IPL-2021) च्या दुसऱ्या सत्रामध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद (DC Vs SRH) यांच्यात आज लढत होणार आहे. परंतु सामन्याआधीच हैदराबाद संघाला मोठा धक्का बसला आहे. कोरोनाच्या विळख्यात (Covid -19) हैदराबाद संघाचा एक खेळाडू सापडला आहे. आयपीएलच्या (First Phase Of IPL) पहिल्या सत्रात दिल्ली टीम ८ सामन्यांमधून १२ अंकांच्यासोबत पॉईंट टेबलवर पहिल्या क्रमाकांवर होती.

    हैदराबाद संघाचा वेगवान खेळाडू टी.नटराजन कोरोना संक्रमित झाला असून त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बीसीसीआयने BCCI सांगितलं की, कोरोनाचं संकट असलं तरी सामना सुरूच राहणार आहे. मात्र, नटराजन कोरोनाच्या विळख्यात सापडला असून हैदराबादचा ऑलराऊंडर खेळाडू विजय शंकर याशिवाय पाच कोचिंग स्टाफला विलगीकरण कक्षात पाठवण्यात आलं आहे.