आयसीसीने केली भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यासाठी पंचांची घोषणा

भारतीय संघाने स्पर्धेतील सर्व साखळी सामन्यांमध्ये अव्वल स्थान मिळविले. न्यूझीलंड ५ विजयांसह चौथ्या स्थानावर आहे.

    विश्वचषक उपांत्य फेरी २०२३ साठी पंच : वनडे विश्वचषक २०२३ चे लीग सामने संपले आहेत. आता या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बुधवार, १५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यासाठी आयसीसीने पंचांची घोषणा केली आहे. रिचर्ड इलिंगवर्थ आणि रॉड टकर हे या सामन्याचे मैदानी पंच असणार आहेत. तिसऱ्या पंचाची जबाबदारी जोएल विल्सन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

    भारतीय संघाने स्पर्धेतील सर्व साखळी सामन्यांमध्ये अव्वल स्थान मिळविले. न्यूझीलंड ५ विजयांसह चौथ्या स्थानावर आहे. स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना पहिल्या आणि चौथ्या क्रमांकावरील संघांमध्ये खेळवला जाईल. यानंतर दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी क्रमांक दोन आणि तीन संघांमध्ये लढत होईल. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया ७-७ विजयांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. स्पर्धेचा दुसरा उपांत्य सामना गुरुवार, १६ ऑक्टोबर रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन येथे खेळवला जाईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी १९ नोव्हेंबरला अंतिम सामना होणार आहे.

    या स्पर्धेच्या साखळी टप्प्यात अपराजित राहिलेला यजमान भारत हा एकमेव संघ होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ९ पैकी ९ सामने जिंकले. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात केली. भारताने कांगारू संघाचा ६ गडी राखून पराभव केला होता. यानंतर दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या सामन्यात रोहित ब्रिगेडने अफगाणिस्तानचा ८ गडी राखून पराभव केला. त्यानंतर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला. यानंतर मेन इन ब्लूने चौथ्या सामन्यात बांग्लादेशचा ७ गडी राखून, पाचव्या सामन्यात न्यूझीलंडचा ४ गडी राखून, सहाव्या सामन्यात इंग्लंडचा १०० धावांनी, सातव्या सामन्यात श्रीलंकेचा ३०२ धावांनी, दक्षिण आफ्रिकेचा २४३ धावांनी पराभव केला. आठव्या आणि नेदरलँड्सचा १६० धावांनी पराभव केला.