टी-२० वर्ल्डकपबाबत आयसीसीकडून मोठी घोषणा, ‘या’ देशात खेळवले जाणार सामने, पाहा कधी आणि कुठे ?

आयसीसी टी-२० विश्वचषकाचे संपूर्ण सामने हे युएई आणि ओमान देशात घेण्यात येणार असल्याचे काही दिवासंपूर्वी आयसीसीने सांगितले होते. त्यानंतर आता स्पर्धा सुरु होण्याची नेमकी तारीख आय़सीसीने सांगितली असून १७ ऑक्टोबर, २०२१ रोजी स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे.

    आयसीसी टी-२० (ICC T-20 World Cup)  विश्वचषकाचे आयोजन भारतात करण्यात येणार होते. परंतु कोरोनाच्या संसर्गामुळे ही स्पर्धा भारतात नव्हे तर युएईमध्ये घेण्याचा निर्णय आयसीसीकडून घेण्यात आला आहे. आयसीसीच्या म्हणण्यानुसार ही स्पर्धा भारतात होणार नसली, तरी बीसीसीआय या स्पर्धेचे आयोजन करेल.स्पर्धेचे सर्व अधिकारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (BCCI) राहणार आहेत. आयसीसीने नुकतीछ विश्वचषकाच्या तारखा जाहीर करत सामने सुरु होण्याची तारीख आणि अंतिम सामना कधी खेळवला जाणार, याची तारीखही जाहीर केली आहे.

    विश्वचषकाचे संपूर्ण सामने हे युएई आणि ओमान देशात घेण्यात येणार असल्याचे काही दिवासंपूर्वी आयसीसीने सांगितले होते. त्यानंतर आता स्पर्धा सुरु होण्याची नेमकी तारीख आय़सीसीने सांगितली असून १७ ऑक्टोबर, २०२१ रोजी स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. त्यानंतर अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार असल्याचेही आयसीसीने स्पष्ट केले. संपूर्ण सामने केवळ चार मैदानात खेळवले जाणार आहेत. यामध्ये दुबई इंटरनेशनल स्टेडियम, शेख जायद स्टेडियम, शारजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अँकेडमी ग्राउंड या मैदानांचा समावेश आहे.

    पहिल्या राऊंडमध्ये ८ संघांदरम्यान १२ सामने खेळविले जातील. यामधून चार संघ सुपर १२ साठी क्वालिफाय करतील. आठमधल्या चार टीम अव्वल ८ रँकिंगमध्ये सामिल होऊन सुपर १२ मध्ये पोहोचतील.