जाडेजा अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल; फलंदाजांमध्ये कोहली चौथ्या स्थानी

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अखेरच्या दिवसाच्या खेळाला सुरूवात होण्याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कसोटी क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाने ऑलराउंडरमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली आहे. जाडेजाने वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरला मागे टाकत पहिले स्थान मिळवले. होल्डरला नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. त्यामुळे त्याचे 28 गुण कमी झाले असून 384 गुणांसह त्याची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. याचा फायदा जाडेजाला झाला असून त्याने 386 गुणांसह अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

    दुबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अखेरच्या दिवसाच्या खेळाला सुरूवात होण्याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कसोटी क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाने ऑलराउंडरमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली आहे. जाडेजाने वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरला मागे टाकत पहिले स्थान मिळवले. होल्डरला नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. त्यामुळे त्याचे 28 गुण कमी झाले असून 384 गुणांसह त्याची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. याचा फायदा जाडेजाला झाला असून त्याने 386 गुणांसह अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

    जाडेजा याआधी ऑगस्ट 2017 मध्ये कसोटी क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानावर होता. या क्रमवारीत इंग्लंडचा बेन स्टोक्स तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचे 377 गुण आहेत. भारताचा फिरकीपटू आर अश्विन 353 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तर बांगलादेशचा शाकिब अल हसन पाचव्या स्थानावर आहे.

    फलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ पहिल्या, न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन दुसऱ्या, मार्नस लाबुशेन तिसऱ्या तर विराट कोहली चौथ्या स्थानावर आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत पॅट कमिंन्स पहिल्या स्थानावर आहे. त्याचे 908 गुण आहेत. तर अश्विन 850 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

    वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेच्या पहिल्या कसोटीत शतक आणि दुसऱ्या कसोटीत 96 धावांची खेळी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकला फलंदाजांमध्ये दोन स्थानांची बढती मिळाली आहे. तो 717 गुणांसह दहाव्या स्थानी पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरलाही एका स्थानाची बढती मिळाली असून तो 19 व्या स्थानी पोहोचला आहे. तसेच आफ्रिकेच्याच रॅसी वॅन डर डूसेनला तब्बल 31 स्थानांची बढती मिळाली असून त्याने 31 वे स्थान पटकावले आहे.